Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सातारा पालिकेत रणकंदन! ४२ विषयांचा अजेंडा आणि सोनगाव कचरा डेपोचा धूर

सर्वसाधारण सभा सातारा नगरपालिकेतील चार वर्षांची प्रदीर्घ प्रशासकीय राजवट संपल्यानंतर नवनिर्वाचित लोकनियुक्त कार्यकारिणीची पहिलीच सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. ७) नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 06, 2026 | 03:28 PM
Satara News: सातारा पालिकेत रणकंदन! ४२ विषयांचा अजेंडा आणि सोनगाव कचरा डेपोचा धूर
Follow Us
Close
Follow Us:

 

Satara News: सातारा पालिकेची मंगळवारी सकाळी 11 वाजता होणारी सभा ही वादळी होणार असून या सभेमध्ये सातारा शहरातील अतिक्रमणे 224 विकास कामांच्या प्रस्तावांना मागितलेली मुदतवाढ,कनिष्ठ श्रेणीच्या पाणीपुरवठा अभियंत्याला त्याच्या पदोन्नतीचा निवड समिती शिवाय देण्यात आलेला प्रस्ताव,स्वच्छता पुरवठा ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करताना त्याच ठेकेदाराला मुदतवाढ देण्याची झालेली मागणी अशा विविध विषयांवर वादळी चर्चा होणार आहे. प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये सत्ताधारी नगरसेवकच प्रशासनावर टीकेची तोफ डागणार असून सोनगाव कचरा डेपो वरूनही राजकीय रणकंदन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टिकेचा राजकीय धूर शामवण्यासाठीच खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची सभा होऊन पार्टी मीटिंगमध्ये दोन्ही नेत्यांनी नगरसेवकांशी संवाद साधला.

सर्वसाधारण सभा सातारा नगरपालिकेतील चार वर्षांची प्रदीर्घ प्रशासकीय राजवट संपल्यानंतर नवनिर्वाचित लोकनियुक्त कार्यकारिणीची पहिलीच सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. ७) नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या सभेपुढे शहर विकासाचे एकूण ४२ विषय मांडण्यात आले असले, तरी सोनगाव कचरा डेपोतील भीषण आगीची घटना आणि त्यावरील उपाययोजनांचा मुद्दा सर्वाधिक गाजण्याची चिन्हे आहेत.

अतिवृष्टीमुळे हळद पिकाच्या उत्पादनात मोठी घट! उमरखेड-महागाव तालुक्यातील स्थिती; विविध रोगाचा प्रादुर्भाव

विशेषतः या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय या सभेत चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.सातारा विकास आघाडी अर्थात खासदार गटाच्या नगरसेविका मुक्ता लेवे यांनी तब्बल 21 विषयांवर उपसूचना मांडण्याची तयारी केल्याने सभागृहाचे वातावरण गरम होण्याची चिन्हे आहेत. ठराविक ठेकेदारांना अभय देण्याचा प्रयत्न प्रस्ताव देताना त्याच्यावर प्रशासनाने न केलेली तयारी काही विषयांची पुनरावृत्ती तर अजेंड्यावर परस्पर विरोधी ठरावल्याने प्रशासन नक्की काय करते असा प्रश्न नगरसेवकांकडून विचारला जाणार आहे .

या सभेत ५० लोकनियुक्त आणि पाच स्वीकृत नगरसेवक प्रथमच आपली मते मांडतील. सभागृहात प्रबळ विरोधक नसल्याने विषयांना मंजुरी मिळणे सुलभ असले, तरी जनहिताच्या प्रश्नांवर खडाजंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दि. ९ मार्च रोजी सोनगाव डेपोत लागलेल्या आगीमुळे केवळ पालिकेचीच नव्हे, तर परिसरातील गावांचीही मोठी कोंडी झाली. या सभेत डेपोतील घनकचरा व्यवस्थापनाचा जुना ठेका रद्द करून तेथे कायमस्वरूपी फायर हायड्रंट यंत्रणा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.

पाकिस्तानात ‘या’ 5 भारतीय चित्रपटांनी मारली बाजी! Netflix वर क्राइम थ्रिलर चित्रपट ठरला नंबर 1

याव्यतिरिक्त शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर बंदी घालणे, शाहूपुरीतील पोहणे तलावाचे सुधारित अंदाजपत्रक, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, भटक्या श्वानांचे लसीकरण, लाड-पागे समितीनुसार सफाई कामगारांची वारसा हक्काने भरती आणि रस्ते डांबरीकरण यांसारखे महत्त्वपूर्ण विषय अजेंड्यावर आहेत. सातारकरांच्या नजरा आता या पहिल्याच सभेतून होणाऱ्या निर्णयांकडे लागल्या आहेत.

ठेकेदाराला ‘धूर’ भोवणार…

गेल्या काही दिवसांपासून सोनगाव कचरा डेपोतील धुराने सातारकरांचा श्वास कोंडला आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि ठेकेदाराचा निष्काळजीपणा यावर नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. संबंधित दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून शहराला कचरामुक्त करण्याच्या दृष्टीने ही पहिली सभा निर्णायक ठरेल.

Web Title: Stormy session ahead for satara council first general body meeting to discuss encroachments and fire incidents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 03:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.