Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बलवान युवा पिढी हीच खरी देशाची संपत्ती : शिवेंद्रसिंहराजे भोसले

आपण बऱ्याचदा 'आरोग्यम धनसंपदा' असे ऐकत असतो. शरीर बलवान आणि तंदुरुस्त असणे ही एक मोठी संपत्ती आहे. शरीर तंदुरुस्त असेल तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. बलवान युवा पिढी हीच खरी देशाची संपत्ती आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 04, 2022 | 04:12 PM
बलवान युवा पिढी हीच खरी देशाची संपत्ती : शिवेंद्रसिंहराजे भोसले
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : आपण बऱ्याचदा ‘आरोग्यम धनसंपदा’ असे ऐकत असतो. शरीर बलवान आणि तंदुरुस्त असणे ही एक मोठी संपत्ती आहे. शरीर तंदुरुस्त असेल तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. बलवान युवा पिढी हीच खरी देशाची संपत्ती असून, युवावर्ग व्यसनापासून दूर ठेवणे आणि तो शारीरिकदृष्टया तंदुरुस्त असणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी केले.

निशिकांत पिसाळ आणि बाळासाहेब भुजबळ मित्रसमूहाच्यावतीने राजवाडा गांधी मैदान येथे ‘बाबाराजे श्री २०२२’ पश्चिम विभाग शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी निशिकांत पिसाळ, बाळासाहेब भुजबळ, पश्चिम महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र हेंद्रे, दिलीप धुमाळ, महेश गणगे, मुरली वत्स, संदीप यादव, दीपक माने, नगर विकास आघाडीचे सर्व आजी- माजी माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवरांसह मित्रसमूहाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा विजेता भारतीय सैन्यदलाचा खेळाडू अनुज तालियान हाही उपस्थित होता. त्याच्या प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यातून ८० स्पर्धक सहभागी झाले होते. पुण्याच्या तौसिफ मोमीन याने बाबाराजे श्री २०२२ हा ‘किताब पटकावला. कोल्हापूरच्या ऋषिकेश वगरे याने बेस्ट पोसिंग तर सातारच्या रामा मैनाक याने मोस्ट मस्क्युलर ‘किताब मिळवला. सहा वजन गटात झालेल्या या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.

Web Title: Strong young generation is the real wealth of the country says shivendra singh raje bhosale nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2022 | 04:12 PM

Topics:  

  • Shivendra Raje Bhosale

संबंधित बातम्या

‘छत्रपतींच्या वारसदारांनी गादीसह विचारांचा वारसाही चालवावा’; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा शिवेंद्रराजेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल
1

‘छत्रपतींच्या वारसदारांनी गादीसह विचारांचा वारसाही चालवावा’; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा शिवेंद्रराजेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.