Even after 24 hours, the mystery of the death of a young woman who was found naked after beheading still remains, the Director General of Police inspected the scene.
अकोला : उंच इमारती, घरे, कंपन्या, दुकाने आणि शेतमालाला आगी लागण्याच्या घटनांमध्ये जीवावर उदार होवून आग विझविण्यासाठी झटणा-या अकोला अग्निशामक दलातील कंत्राटी आणि मानधनावरील जवानांना नियमित सेवेत सामावून घेण्याच्या कार्यादेशांची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, अगदी तुटपुंज्या मानधनावर आपला जीव धोक्यात घालून आगीच्या आपत्तीमध्ये स्वत:ला झोकून देणा-या या कंत्राटी आणि मानधनावरील जवानांचा साधा विमाही उतरविण्यात आला नसल्याचीही खळबळजनक तितकीच धक्कादायक माहिती हाती आली आहे. वर्षभरात या जवानांनी जीव धोक्यात घालून जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सुमारे २०० ठिकाणच्या आगी विझविल्या आहेत.
[read_also content=”२४ तासानंतरही शिरच्छेद करून विवस्त्र अवस्थेत आढळून आलेल्या युवतीच्या मृत्यूचे गुढ अजूनही कायम, पोलिस महासंचालकांनी केली घटनास्थळाची पाहणी https://www.navarashtra.com/maharashtra/even-after-24-hours-the-mystery-of-the-death-of-a-young-woman-who-was-found-naked-after-beheading-still-remains-the-director-general-of-police-inspected-the-scene-nraa-264961.html”]
अकोला महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या अग्निशामक दलातील जवानांसोबत ‘दैनिक नवराष्ट्र’ने संवाद साधला असता काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोला अग्निशामक दलामध्ये सध्या एकूण ८ वाहने असून, त्यापैकी ६ वाहने चांगल्या स्थितीत तर दोन वाहने नादुरूस्त आहेत. त्या व्यतिरिक्त दोन छोट्या गाड्या या विभागात आहेत. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी एक अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. येथे एकूण ७३ जवान कार्यरत आहेत. त्यामध्ये २३ कर्मचारी हे स्थायी (नियमित) स्वरूपाचे असून, २४ कर्मचारी हे कंत्राटी तर २६ कर्मचारी हे मानधनावर नियुक्त करण्यात आलेले आहेत. मानधनावर कार्यरत असणा-या या कर्मवारी वर्गामध्ये काहीजण अकोल्यात नगरपालिका अस्तित्वात असल्याच्या काळापासून कार्यरत आहेत परंतु आजवर त्यांचा साधा विमा काढण्याचीही तसदी मनपा प्रशासनाने का घेतली नाही ? असा सवाल उपस्थित झाला आहे.
[read_also content=”समृद्धी महामार्गाच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीसांचेच, त्यांच्याच हस्तेच व्हावे समृद्धीचे लोकार्पण – चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/the-entire-credit-for-the-construction-of-samrudhi-highway-should-go-to-devendra-fadnavis-nraa-264755.html”]
स्थायी किंवा नियमीत स्वरूपातील कर्मचा-यांना दरमहा ३० हजाराच्या आसपास वेतन आहे तर मानधनावरील कर्मचा-यांना १५ हजार रूपये मानधन असले, तरी पीएफ वगैरे कापून त्यांच्या हाती दरमहा ८ हजार ६०० रूपये पडतात. कंत्राटी कर्मचा-यांची नेमणूक एका ठेकेदारामार्फत करण्यात येते. मुळात या कंत्राटी कर्मचा-यांना कागदोपत्री १७ हजार ४०० रूपये वेतन दाखविले जात असले, तरी ठेकेदार त्यांच्या हातावर दरमहा केवळ १० हजार रूपयेच टिकवीत असल्याची माहिती या कर्मचारी वर्गाने मांडलेल्या व्यथेतून समोर आली. एवढया तुटपुंज्या मानधनावर जीव धोक्यात घालून काम करणारे हे कंत्राटी आणि मानधनावरील कर्मचारी जीवन विमा योजनेपासून वंचित आहेत.
[read_also content=”१० वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे मिनी मंत्रालयात बस्तान, सीईओंच्या आदेशालाही बगल https://www.navarashtra.com/maharashtra/bastan-has-been-in-the-mini-ministry-for-10-years-ignoring-the-orders-of-the-ceos-nraa-264691.html”]
आगीच्या घटना म्हणजे जीवावरचा खेळच, त्यामध्ये काही बरेवाईट झाल्यास या कंत्राटी आणि मानधनावरील कर्मचा-यांचा वाली कोण? असा सवालही यानिमित्ताने समोर आला आहे. हे जवान वाहनचालक, क्लिनर, पंप ऑपरेटर, लिडींग फायरमन, फायरमन म्हणून कार्यरत आहेत. उन्हाळयात अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट आणि इतर कारणांनीही आगीच्या घटना घडत असतात. अशावेळी हे कर्मचारी जीवाची बाजी लावून आग विझवीत असतात, गेल्या वर्षभराच्या काळात या जवानांनी जीवावर उदार होऊन २०० आगीच्या घटनांचा सामना केला आहे, यामध्ये काही बरेवाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे मनपा प्रशासनाने त्यांचा जीवन विमा उतरविण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.
[read_also content=”अकोटात महसूल कर्मचारी बेमुदत संपावर ! महसूल विभागाचे कामकाज ठप्प, नागरिकांची होतेय फरफट https://www.navarashtra.com/maharashtra/revenue-employees-on-indefinite-strike-in-akota-the-work-of-the-revenue-department-has-come-to-a-standstill-nraa-264739.html”]
कंत्राटी कर्मचा-यांची ११ महिन्यांच्या करारावर नियुक्ती करण्यात येते, यावर्षीचा त्यांचा करार २३ एप्रिल रोजी संपुष्टात येणार असून, त्यानंतर त्यांना पुढील कार्यादेश दिले जातील, अशी माहिती विभाग प्रमुख मनिष कतले यांनी दिली आहे. दुसरीकडे मानधनावरील कर्मचा-यांना ६ महिन्यांच्या करारावर नियुक्ती दिली जाते, त्यांचा करार संपुष्टात आल्याने त्यांना पुढील कार्यादेश देण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीत वाढ झाल्याने अग्निशामक दलावरील ताणही वाढला आहे. त्यामुळे या सर्वच कर्मचा-यांना पूर्णपणे कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली जात आहे.