Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election: “पाच वर्षे तालुक्यात केलेल्या कामाच्या…”; सुनील शेळकेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

जनतेच्या विश्वासावर आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. शनिवारी वडगाव मावळ येथे ग्रामदैवत पोटोबा महाराजांच्या आशीर्वाद घेऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती शेळके यांनी दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2024 | 07:38 PM
Maharashtra Election: "पाच वर्षे तालुक्यात केलेल्या कामाच्या..."; सुनील शेळकेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Maharashtra Election: "पाच वर्षे तालुक्यात केलेल्या कामाच्या..."; सुनील शेळकेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र अनेक इच्छुकाना उमेदवारी न दिली गेल्याने त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता वडगाव मावळचे महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मावळ पॅटर्न’ हा चार कुटुंबांपुरता मर्यादित असून ठराविक लोकांविरुद्ध संपूर्ण जनता अशी ही लढाई असून आपण एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही आडनावाच्या विरोधात ही निवडणूक नाही.पाच वर्षे तालुक्यात केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही मते मागणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वडगाव मावळ येथे महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार शेळके बोलत होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, भरत येवले, एकविरा देवस्थानचे विश्वस्त दीपक हुलावळे, भाजप नेते देवीदास कडू, सुरेश दाभाडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे आदी उपस्थित होते.
अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वडगाव मावळ येथे झालेल्या सभेत विरोधकांनी केलेले सर्व आरोप आमदार शेळके यांनी फेटाळून लावले. महाआघाडी पुरस्कृत उमेदवाराचा अर्ज भरताना वक्त्यांनी अत्यंत बेताल व वैयक्तिक बदनामी करणारी वक्तव्य केली, ही बाब अत्यंत आक्षेपार्ह आहे. लोकशाहीने सर्वांना भाषण स्वातंत्र्याचा अधिकार‌ दिला आहे. पण त्याचा गैरवापर वक्त्यांनी केल्याचे दिसून आले. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराचा अर्ज का भरला, याबाबत काहीही न बोलता बहुतेक सर्व वक्त्यांनी केवळ सुनील शेळकेला लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आमदार शेळके यांनी केला. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपण दिलेल्या माहितीतील एक शब्द जरी खोटा असेल, तर मी उमेदवारी अर्ज मागे घेईन, असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भाजप कार्यकर्त्यांना स्पष्ट करतो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत संयुक्त बैठक झाली. महायुतीत उमेदवारीवरून तेढ असलेल्या मतदारसंघांमध्ये समन्वयासाठी या बैठकीत प्रयत्न करण्यात आले. मावळातून मला व बाळा भेगडे यांना बोलावण्यात आले होते. मी पोहोचण्यापूर्वी आधी १० मिनिटे फडणवीस व बाळा भेगडे यांच्यात चर्चा झाली. आमदार शेळके यांनी भाजपच्या तिकिटावर लढावे, असे आम्ही सांगत होतो, मात्र त्यांनी न ऐकल्याने बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे बाळा भेगडे यांनी फडणवीस यांना सांगितले, अशी माहिती आमदार शेळके  यांनी दिली.
भाजपच्या नेत्यांनी रवींद्र भेगडे यांना भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासही सांगितले. त्यालाही मी सहमती दर्शवली होती, असा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला. त्यांनी उमेदवारी अर्ज बरोबर एबी फॉर्म जोडला की नाही माहित नाही, असेही ते म्हणाले. मावळातून कमळ निवडून आले काय किंवा घड्याळ निवडून आले काय, महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. कमळ निवडून आले तरी मला आनंदच होईल, मात्र महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या उमेदवाराला कदापि निवडून येऊ देणार नाही, असे शेळके म्हणाले.
कार्यकर्त्यांना दमदाटीची ‘ऑडिओ क्लिप’
महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या गुंडांकडून दमदाटीचे फोन जात आहे, असा आरोप करीत आमदार शेळके  यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवली. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. खेडोपाड्यात अपरात्री २-३ वाजता कोणाच्याही घरात जाऊ नका. कोणालाही दमदाटी करू नका, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले. हे प्रकार थांबले नाहीत तर या दहशती विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता पेटून उठेल, मावळची जनता रस्त्यावर उतरेल, असा इशाराही शेळके यांनी दिला.
शनिवारी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
जनतेच्या विश्वासावर आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. शनिवारी वडगाव मावळ येथे ग्रामदैवत पोटोबा महाराजांच्या आशीर्वाद घेऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती शेळके यांनी दिली. सध्या भाजपचे कार्यकर्ते दबून आहेत, मात्र चार तारखेनंतर ते सर्वजण खुलून प्रचारात उतरतील, असा दावा शेळके यांनी केला.

Web Title: Sunil shelke expressed confidence of victory at vadgaon maval maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 07:38 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

Sunil Shelke: “…ही लोकांच्या जिवाशी थट्टा”; रस्त्यांच्या दुरावस्थेवर आमदार शेळके आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी
1

Sunil Shelke: “…ही लोकांच्या जिवाशी थट्टा”; रस्त्यांच्या दुरावस्थेवर आमदार शेळके आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी

Sunil Shelke Conspiracy: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; एसआयटी स्थापन
2

Sunil Shelke Conspiracy: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; एसआयटी स्थापन

इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज…; आमदार शेळकेंकडून ठोस उपायांची मागणी
3

इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज…; आमदार शेळकेंकडून ठोस उपायांची मागणी

अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराने बुडवली हजारो कोटीची रॉयल्टी? संजय राऊतांचा गंभीर आरोप
4

अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराने बुडवली हजारो कोटीची रॉयल्टी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.