Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger : राष्ट्रवादीचे २०-२२ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ! सुनील शेळकेंनी स्पष्टच सांगितलं

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसचे २० ते २२ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

  • By विवेक
Updated On: Nov 13, 2026 | 07:35 PM
Sunil shelke on Sanjay Raut

Sunil shelke on Sanjay Raut

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊतांच्या दाव्याने राष्ट्रवादीत चर्चांना उधाण
  • सुनील शेळकेंचा मोठा खुलासा
  • शरद पवार गटाशी संपर्काच्या चर्चा फेटाळल्या
 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार गटातील २० ते २२ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांच्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे २० ते २२ आमदार पक्ष सोडू शकतात, असा दावा केला होता. हे आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आमदारांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर आली होती.

सुनील शेळकेंचा मोठा खुलासा, आम्हाला कोणाचाही फोन नाही

या सगळ्या चर्चांवर सुनील शेळके यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, आमचे कोणतेही आमदार कुणाच्याही संपर्कात नाहीत. शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याचा आम्हाला फोन आलेला नाही. संजय राऊत कधीपासून भविष्यवाणी करायला लागले, हेच मला समजत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा, ‘अजितदादांची तीच इच्छा होती पण…’

आम्ही महायुतीच्या नेत्यांना भेटतो, यात गैर काय? असा सवालही शेळके यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार एकसंघ असून पक्षात फूट पडणार असल्याच्या चर्चा निराधार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी सर्व आमदार

बैठकीबाबत बोलताना शेळके यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर सर्व आमदारांचा विश्वास आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार हे सर्व नेते एकत्र आहेत. अजितदादांनंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आम्ही सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहतो, असेही ते म्हणाले.

विलिनीकरणाच्या चर्चेवर शेळकेंनी काय सांगितले?

आजच्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा कोणताही विषय नव्हता, असे शेळके यांनी स्पष्ट केले. मागील आठवड्यात देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील अडचणी आणि इतर विषय मांडले होते.

एकंदरीत, संजय राऊत यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकजुटीची भूमिका मांडली आहे. आता या राजकीय घडामोडींवर सुनेत्रा पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेते पुढे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NCP Merger : ‘अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच…’ राष्ट्रवादीचं विलिनीकरणावरून सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!

💡

Frequently Asked Questions

  • Que: संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या किती आमदारांबाबत दावा केला आहे?

    Ans: सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे २० ते २२ आमदार पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

  • Que: सुनील शेळके यांनी संजय राऊतांच्या दाव्यावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: आमचा एकही आमदार कोणाच्याही संपर्कात नाही. शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याचा फोन आलेला नाही, असे सुनील शेळके यांनी स्पष्ट केले. त्यांनी संजय राऊतांच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित केला.

  • Que: सुनील शेळके यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत काय सांगितले?

    Ans: अजित पवार यांच्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आम्ही सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहतो. पक्षातील सर्व आमदार आणि नेते त्यांच्या पाठीशी असल्याचे शेळके यांनी सांगितले.

Web Title: Ncp merger ncp mla sunil shelke reaction sanjay raut vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • NCP News
  • NCP Sharad Pawar
  • sanjay raut
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

NCP Merger : ‘अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच…’ राष्ट्रवादीचं विलिनीकरणावरून सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
1

NCP Merger : ‘अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच…’ राष्ट्रवादीचं विलिनीकरणावरून सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!

‘मराठी माणसाबद्दलचा कळवळा ढोंगीपणा’; राम कदमांची संजय राऊतांवर टीका
2

‘मराठी माणसाबद्दलचा कळवळा ढोंगीपणा’; राम कदमांची संजय राऊतांवर टीका

NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा, ‘अजितदादांची तीच इच्छा होती पण…’
3

NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा, ‘अजितदादांची तीच इच्छा होती पण…’

NCP Merger : ‘दादा गेले, विषय संपला!’ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4

NCP Merger : ‘दादा गेले, विषय संपला!’ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.