मुंबई : आरे येथील मेट्रोकारशेडचा (Aarey Metro Carshade ) वाद सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला असून तिथल्या प्रस्वावित प्रकल्पास विरोध करण्यात येत आहे. आरे मध्ये होणारी वृक्षतोड याबाबत पर्यावरणप्रेमींनी याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. कारशेड कामामुळे होणारी वृक्षतोड तातडीने थांबवावी, तसेच कारशेडच्या कामाला स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकेत याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
[read_also content=”विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे https://www.navarashtra.com/maharashtra/ambadas-danve-as-leader-of-opposition-in-legislative-council-nrgm-314171.html”]
आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. एमएमआरसीएलच्या वतीने एसजी तुषार मेहता यांनी आरेमध्ये आतापर्यंत एकही झाड तोडले नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले आहे. 2019 मध्ये बंदी घातल्यापासून, अशी कोणतीही प्रक्रिया पुढे नेण्यात आलेली नाही. तुषार मेहता सांगतात की फक्त काही झुडपे, गवत कापले आहे. काही पानेही तोडली आहेत, पण एकही झाड पूर्णपणे तोडलेले नाही. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून पुन्हा एकदा मेट्रो कारशेड प्रकल्पाचे काम आरे येथे हलविण्यात आले.
[read_also content=”शिंदे सरकारमधील नव्या मंत्र्याची संभाव्य खाती https://www.navarashtra.com/maharashtra/possible-accounts-of-new-minister-in-shinde-govt-314148.html”]