Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election: ‘…तर ते यश कसं होऊ शकतं?’ SC नं याचिका फेटाळताना ‘मविआ’ला झापलं

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आहे. महायुतीने न भूतो न भविष्यती असे यश संपादन केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 26, 2024 | 05:41 PM
Maharashtra Election: '...तर ते यश कसं होऊ शकतं?' SC नं याचिका फेटाळताना 'मविआ'ला झापलं

Maharashtra Election: '...तर ते यश कसं होऊ शकतं?' SC नं याचिका फेटाळताना 'मविआ'ला झापलं

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra vidhansabha Nivadnuk 2024:  महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आहे. महायुतीने न भूतो न भविष्यती असे यश संपादन केले आहे. महायुतीने 288 जागांपैकी एकूण 230  जागा जिंकत घवघवीत बहुमत प्राप्त केले आहे. तर एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान महाविकास आघाडीने या निर्णयावर संशय व्यक्त केला होता. ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आल्याने आपल्या सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला असे म्हणत याविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. त्यावर आज कोर्टात सुनावणी पार पाडली.

सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडीची बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली आहे. पराभव झाला तर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आणि तुम्ही जिंकलात तर ते यश. असे कसे होऊ शकते? असा सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला. मतदारांना प्रलोभन दाखवताना पैसे , दारू आणि अन्य वस्तूंचे वाटप केल्यास उमेदवारास पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी असणार आहे असे कोर्ट म्हणाले. दरम्यान कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळून लावल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

अतुल लिमये महायुतीच्या विजयाचे शिल्पकार

विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. जो निकाल समोर आला ते पाहून ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे म्हटले जाते. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला नियोजनबद्ध मदत केल्याचे समोर येत आहे. हे सगळे नियोजन संघाच्या अतुल लिमये यांनी केल्याचे म्हटले जात आहे. अतुल लिमये हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव आहेत.

हेही वाचा: RSS For BJP: प्रचारक ते संयुक्त महासचिव; महायुतीच्या विजयाचे शिल्पकार, संघाचे अतुल लिमये आहेत तरी कोण?

कोण आहेत अतुल लिमये?

अतुल लिमये  हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव आहेत. ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आखलेल्या कुशल रणनीतीमुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे म्हटले जाते. अतुल लिमये हे गेले अनेक वर्षे एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करत होते. त्यांनी ती नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण वेळ संघासाठी प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने कुशल आणि सूक्ष्म नियोजन केले, त्यामुळेच भाजपला विजय मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.

अतुल लिमये हे सुरुवातीला महाराष्ट्रात, रायगड आणि कोकण प्रांतात काम करत होते. त्यानंतर त्यांना देवगिरी प्रांत, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली. ते सह प्रांत प्रचारक होते. 2014 च्या कालावधीत त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र , गुजरात आणि गोवा प्रांताची व्यापक जबाबदारी देण्यात आली. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची सखोल जाण असल्याने, तसेच अगदी तळगाळापर्यंत संपर्क असल्याने उत्तम रणनीतीकार म्हणून त्यांचे समोर आले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी लिमये यांनी नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीस व संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाह जवळून काम केले. त्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Supreme court rejects the mva petition about evm machine scam for maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 05:30 PM

Topics:  

  • EVM Machine
  • Maharashtra Assembly election 2024
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली
1

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय
2

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश
3

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण
4

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.