Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Politics: स्वाभिमानी शेतकरी संघटना चितपट; एकनाथ शिंदेंच्या गोटात नव्या खेळाडूची एंट्री

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी राजू शेट्टींचा हात सोडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 27, 2025 | 01:12 PM
Ahilyanagar Politics: स्वाभिमानी शेतकरी संघटना चितपट; एकनाथ शिंदेंच्या गोटात नव्या खेळाडूची एंट्री
Follow Us
Close
Follow Us:
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू
  • राजू शेट्टी यांना मोठा धक्का
  • रवींद्र मोरेंची संघटनेला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

Ahilyanagar Politics:   आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र मोरे आणि त्यांचे समर्थक शिंदे गटात दाखल झाले.

मोरे यांच्या या निर्णयामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यातील आक्रमक, आंदोलनशील आणि धडाडीचे शेतकरी नेते अशी मोरे यांची ओळख आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून त्यांनी सातत्याने लढा दिला होता.

Bihar News: देशभरात ‘मत चोरी’चे कट रचले जात आहेत; प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

ऊसदर, वीजदर, हमीभाव आणि दुष्काळी मदतीसाठी ठिणगी उडवणारी आंदोलने करून जिल्ह्यात ताकद निर्माण करणारे   रवींद्र (रवी) मोरे यांनी मंगळवारी रात्री संघटनेला सोडचिठ्ठी देत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोरे समर्थकांसह शिंदे गटात दाखल झाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी राजू शेट्टींचा हात सोडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. मोरे यांच्या प्रवेशावेळी त्यांची शिवसेना शेतकरी सेना उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मोरे यांच्या जाण्यामुळे नगर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना नेतृत्वशून्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, मोरे यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे शिवसेनेचा शिंदे गट मात्र जिल्ह्यात अधिक बळकट होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.

Jalgaon Crime News : जळगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला

“गेल्या वीस वर्षांपासून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम केले. शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ आंदोलनांनी सुटत नाहीत. आता निर्णय घेण्याची ताकद हवी, म्हणूनच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सत्ताधारी पक्षात, म्हणजेच शिवसेनेत प्रवेश केला आहे,” असे रवींद्र मोरे यांनी स्पष्ट केले. तसेच, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही सत्तेत राहून अधिक आक्रमक पद्धतीने काम करू. राजू शेट्टींनी आम्हाला नेहमीच सहकार्य केले असून त्यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नाही. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Web Title: Swabhimani shetkari sanghatana district president ravindra more joins eknath shindes shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Raju Shetti
  • Swabhimani Shetkari Saghtana

संबंधित बातम्या

जो आडवा येईल त्याला तुडविणार, तुम्ही पैलवान असलात तरी…; राजू शेट्टींचा इशारा
1

जो आडवा येईल त्याला तुडविणार, तुम्ही पैलवान असलात तरी…; राजू शेट्टींचा इशारा

‘विना कपात पहिली उचल 3752 द्या’; राजू शेट्टी यांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा
2

‘विना कपात पहिली उचल 3752 द्या’; राजू शेट्टी यांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा

10 नोव्हेंबरपर्यंत कारखानदारांनी निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही…; राजू शेट्टींचा इशारा
3

10 नोव्हेंबरपर्यंत कारखानदारांनी निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही…; राजू शेट्टींचा इशारा

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती
4

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.