थकीत एफआरपीची रक्कम १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत साखर आयुक्तांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागणी केली आहे.
राज्यामध्ये दररोज ८ हून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. या अशा काळातही राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास हात आखडता घेत आहे. नागपूरमध्ये राज्याचे अधिवेशन सुरू होत आहे.
ऊस आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत ठेवले होते. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.
माधवराव घाटगे यांनी शहरातील पिग्मी एजंट ते नामांकित चार्टर्ड अकाउंटंट म्हणून सामान्य कुटुंबातून आलेले सुदर्शन कदम यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे.
सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पीक आहे, यंदा द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे द्राक्षे बागा, डाळिंब, पिकांचे नुकसान झाले आहे.
ऊस दराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, शिरोळ तालुक्यातील कर्नाटक सीमाभागात ऊस वाहतूक रोखण्यासाठी संघटनेने तंबू ठोकले आहेत.
एका बाजूला पावसाच्या अनिश्चिततेमुळे ऊसाचे उत्पादन घटले तर दुसऱ्या बाजूला साखर कारखानदार करत असलेल्या काटामारीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे.
जो आडवा येईल, त्याला तुडवल्याशिवाय राहणार नाही.’’ असा इशारा राजकीय नेत्याचे नाव न घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
कारखानदारांनी आमची मागणी पूर्ण न केल्यास राज्यभरात आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या ऊस परिषदेस राज्यभरातून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आले होते.
११ नोव्हेंबरपासून रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी यांनी दिला आहे. जयसिंगपूर येथील विक्रम मैदानावर झालेल्या २४ व्या ऊस परिषदेत शेट्टी बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी राजू शेट्टींचा हात सोडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
राजू शेट्टी यांनी अनंत अंबानी यांचे मनापासून आभार मानले आहेत. अनंत अंबानींच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
सध्या कोकणात येण्यासाठी कोल्हापूर येथून ७ महामार्ग आहेत. कोकणातील अनेक प्रकल्प निधीअभावी अपुरे आहेत. १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग १५ वर्षांपासून निधीअभावी रखडला आहे.
सामान्य जनतेसाठी व शेतकरी वर्गासाठी लढणाऱ्या संघटनातील नेते बाहेर पडल्याने नेते मैदानात, कार्यकर्ते रिंगणात अशी अवस्था झाली आहे. अशा परिस्थतीत शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार? असा प्रश्न उभा राहिला आहे.