जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हल्ला झालेल्या माजी नगरसेवकांचे नाव प्रभाकर चौधरी आहे. मात्र हा हल्ला कोणत्या कारणावरून करण्यात आला हे अध्यापत स्पष्ट झालेले नाही आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले होते. अश्यातच रात्रीच्या सुमारास वैष्णवी साडी सेंटर जवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी प्रभाकर चौधरी यांना अडवून त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. त्यानंतर रात्री उशिरापार्यंत पोलीस या स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भागांमध्ये पथके रवाना केली आहे. हा हल्ला कुणी आणि का केला हे कारण रात्री उशिरापर्यंत कळू शकलेले नाही आहे.
जळगावात फिल्मी स्टाईल चोरी; अल्पवयीन मुलाने केलं फिट आल्याचं नाटक, मदतीला धावताच चोरटयांनी केला हात साफ
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात फिल्मी स्टाईल चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. नूराणी नगर भागात चोरट्यांनी फिल्मी पद्धतीने दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाचा वापर करून मुख्याध्यापकांकडून सेवानिवृत्त शिक्षकाच्या ताब्यात रोकड चोरली गेली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पाचोरा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक जेडीसीसी बँकेतून एका मुख्याध्यापकांनी शाळेसाठी संगणक खरेदीसाठी आणि बांधकाम मिस्त्रीला देण्यासाठी दोन लाख रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी सेवानिवृत्त शिक्षक शेख खलिल शेख नुरा यांच्या ताब्यात दिली. शेख खलिल यांनी ही रोकड आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि घराकडे निघाले.
ते घरी पोहोचताच, त्यांनी आपल्या घराच्या कंपाऊंडमध्ये दुचाकी लावली आणि तेवढ्यात रस्त्यावर एक लहान मुलगा अचानक खाली पडून फिट आल्याचा नाट्यमय अभिनय करून लागला. खालील शेख हे तत्काळ मदतीसाठी त्या मुलाकडे धावले. त्याच्यावेळी त्यांच्या दुचाकीची चावी दुचाकीलाच राहिली होती.
ते त्या मुलाजवळ गेले असता काही क्षणांतच दोन अनोळखी इसम दुचाकीवर तेथे आले. त्यांनी शेख खालील यांना मुलाला पाणी द्या’ असा सल्ला देत त्यांचे लक्ष अधिक विचलित केले. शेख खलिल घरात पाणी आणायला गेले तेव्हा त्या चोरट्यांनी संधीचा फायदा घेत चोरट्यांनी डिक्कीतील दोन लाख रुपये चोरले. त्यानंतर अल्पवयीन मुलासह तिघांनीं मिळून सिनेस्टाईलने पळ काढला.
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पाचोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून,परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.