Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politic 2024 : राजू शेट्टी यांना धक्का; मोठ्या नेत्याने ऐन निवडणुकीत शेतकरी संघटनेला ठोकला रामराम

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संघटनेला रामराम ठोकला. वैभव कांबळे यांनी संघटनेतून बाहेर पडताना राजू शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 01, 2024 | 04:09 PM
कोल्हापुरात दोन दिवसांत मोठा राजकीय भूकंप? राजू शेट्टींना धक्का बसणार

कोल्हापुरात दोन दिवसांत मोठा राजकीय भूकंप? राजू शेट्टींना धक्का बसणार

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात विधानसभा निवडणुकाची धामधूम सुरू असून सोमवारनंतर प्रचाराचा तोफा धडाडणार आहे. मात्र तिसऱ्या आघाडीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि राजू शेट्टी यांना ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संघटनेला रामराम ठोकला. वैभव कांबळे यांनी संघटनेतून बाहेर पडताना राजू शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा-देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ; गुप्तचरांच्या अहवालानंतर सरकारचा निर्णय, घराबाहेर कमांडो तैनात

राजू शेट्टी हुकुमशाह असल्यासारखं वागतात, असा आरोप वैभव कांबळे यांनी केला आहे. राजू शेट्टी यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता विधानसभा निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतले आहेत, असे आरोप वैभव कांबळे यांनी केले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला काढून संघटनेला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं. कांबळे यांनी आज राजू शेट्टी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला आहे. ऐन निवडणुकीत महत्त्वाचा नेता सोडून गेल्यामुळे स्वाभिमानी संघटनेला मोठा धक्का मानला जात आहे.

तिसऱ्या आघाडीची स्थापनेतून नाराजी?

लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत जाणार अशी चर्चा होती. मात्र मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला. या निवडणुकीत राजू शेट्टी यांचा दारूण पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांनी एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन केली आहे.

हेही वाचा-‘4 तारखेला…’, भाजपच्या विरोधामध्ये नवाब मलिक यांच्या उमेदवारीवर अजित पवारांचे मोठं वक्तव्य

त्यामुळे राजू शेट्टी यांच्या निर्णयावर संघटनेतील काही नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांनी पदाचा राजीनामा देत कार्यकर्त्यांसह संघटनेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांना ऐन निवडणुकीत हा मोठा धक्का मानला जात आहे.

संघटना सोडताना वैभव कांबळे यांनी राजू शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. राजू शेट्टी यांचा नेहमी मनमानी कारभार सुरू असतो. हुकूमशहा असल्यासारखे वागत असतात. तिसरी आघाडी स्थापन करताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही, असे आरोप त्यांनी केले आहेत. यावर राजू शेट्टी काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Swabhimani shetkari sanghatana district president vaibhav kamble resigned his post big blow to raju shetty in maharashtra assembly election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 03:33 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

Ahilyanagar Politics: स्वाभिमानी शेतकरी संघटना चितपट; एकनाथ शिंदेंच्या गोटात नव्या खेळाडूची एंट्री
1

Ahilyanagar Politics: स्वाभिमानी शेतकरी संघटना चितपट; एकनाथ शिंदेंच्या गोटात नव्या खेळाडूची एंट्री

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली
2

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

अखेर वादावर पडदा, माधुरी कोल्हापूरात परत येणार! राजू शेट्टींनी अंबानी परिवाराचे मानले आभार
3

अखेर वादावर पडदा, माधुरी कोल्हापूरात परत येणार! राजू शेट्टींनी अंबानी परिवाराचे मानले आभार

शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून ढपला पाडायचा उद्योग सुरु; राजू शेट्टींचा निशाणा
4

शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून ढपला पाडायचा उद्योग सुरु; राजू शेट्टींचा निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.