Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul President Election 2026 : ‘येताना चालत येतील, जाताना खांद्यावरून जातील’; राजू शेट्टींचा शासननियुक्त संचालकांना इशारा

Gokul President Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून कोल्हापुरात राजकीय संघर्ष पेटला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शासननियुक्त संचालकांना इशारा देत उद्याच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

  • By विवेक
Updated On: Nov 09, 2026 | 06:43 PM
Raju Shetti

Raju Shetti

Follow Us
Follow Us:
  • राजू शेट्टींचा संचालकांना आक्रमक इशारा
  • गोकुळ कार्यालयावर घेराव घालण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन
  • देवेंद्र फडणवीसांवर शेट्टींची टीका
 

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेला राजकीय संघर्ष आता आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि महायुतीवर जोरदार टीका केली आहे. उद्या (10 नोव्हेंबर) होणाऱ्या अध्यक्ष निवड सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शासननियुक्त संचालकांना थेट इशारा दिला आहे. (Gokul President Election 2026)

शासननियुक्त संचालक उद्याच्या सभेला आले तर ते आत येतील, मात्र बाहेर जाताना परिस्थिती वेगळी असेल, असं वादग्रस्त विधान राजू शेट्टी यांनी केलं. ‘येताना चालत येतील, पण जाताना खांद्यावरून जातील’, असा इशारा त्यांनी दिला.

गोकुळ कार्यालयावर घेराव घालायचा का, असा सवाल करत त्यांनी कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं. महायुतीचे नेतेही आपली माणसं आणणार असल्याची माहिती मिळाल्याचं सांगत शेट्टी यांनी दोन्ही बाजूंनी ताकद दाखवण्याची भाषा केली.

अजित पवारांच्या अपघातात सुनील तटकरेंचा हात? रामदास कदमांच्या आरोपांनी राजकारणात मोठी खळबळ

‘गोकुळ कोणाच्या बापाचा नाही’

गोकुळ हा कोल्हापूरच्या जनतेच्या मालकीचा आहे, कोणाच्या बापाचा नाही, असं म्हणत राजू शेट्टी यांनी शासनाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. गुजरातमधून गोकुळवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

गुजरातची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी करत त्यांनी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. नाशिकचं पाणी गुजरातला वळवण्याचा कथित प्रयत्न, हत्तींचा मुद्दा आणि शक्तिपीठ महामार्गाचा संदर्भ देत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.

शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवर आक्षेप

गोकुळच्या निवडणुकीनंतर चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाला शेट्टी यांनी विरोध केला. या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा त्यांचा दावा आहे. न्यायालयाने आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी आणि ड्रोनच्या माध्यमातून मोर्चातील गर्दीची पाहणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

उद्याच्या सभेकडे कोल्हापूरकरांचं लक्ष

सरकारच्या निर्णयाविरोधात सुरू असलेल्या संघर्षात न्यायालयीन लढाईसोबतच रस्त्यावरचं आंदोलनही सुरू आहे. यापूर्वी 9 नोव्हेंबरला सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात राजू शेट्टींसह अनेक नेते आणि दूध उत्पादक सहभागी झाले होते.

आता 10 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता होणाऱ्या अध्यक्ष निवड सभेत नेमकं काय घडतं, शासननियुक्त संचालक सहभागी होतात का आणि न्यायालयाचा निर्णय काय असतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शेट्टी यांच्या विधानानंतर प्रशासनासमोर सभेच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हानही निर्माण झालं आहे.

गोकुळच्या सत्तासंघर्षावर हायकोर्टात जोरदार युक्तिवाद; सिंघवी-रोहतगी आमनेसामने, कोर्टात काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोकुळ अध्यक्ष निवडणूक 2026 वरून राजू शेट्टी यांनी काय इशारा दिला?

    Ans: शासननियुक्त संचालक उद्याच्या अध्यक्ष निवड सभेला आले तर ते आत येतील, मात्र बाहेर जाताना खांद्यावरून जातील, असं वादग्रस्त विधान राजू शेट्टी यांनी केलं.

  • Que: राजू शेट्टी यांनी गोकुळच्या शासननियुक्त संचालकांना विरोध का केला?

    Ans: गोकुळमध्ये चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या सरकारच्या निर्णयाला राजू शेट्टी यांनी विरोध केला आहे. या निर्णयामुळे निवडणुकीतील जनमतावर परिणाम होत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

  • Que: गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड कधी होणार आहे?

    Ans: 10 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड सभा आयोजित करण्यात आली आहे.

Web Title: Gokul president election 2026 raju shetty warning government appointed directors vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • Gokul
  • Gokul Milk
  • Raju Shetti
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Gokul President Election 2026 : गोकुळच्या सत्तासंघर्षावर हायकोर्टात जोरदार युक्तिवाद; सिंघवी-रोहतगी आमनेसामने, कोर्टात काय घडलं?
1

Gokul President Election 2026 : गोकुळच्या सत्तासंघर्षावर हायकोर्टात जोरदार युक्तिवाद; सिंघवी-रोहतगी आमनेसामने, कोर्टात काय घडलं?

Satej Patil: Gokul गिळंकृत करण्याचा डाव? कोल्हापुरात मोठा संघर्ष पेटला
2

Satej Patil: Gokul गिळंकृत करण्याचा डाव? कोल्हापुरात मोठा संघर्ष पेटला

ऊसदरासाठी राजू शेट्टी पुन्हा करणार आंदोलन; पंढरपुरातून आंदोलनाचे फुंकणार रणशिंग
3

ऊसदरासाठी राजू शेट्टी पुन्हा करणार आंदोलन; पंढरपुरातून आंदोलनाचे फुंकणार रणशिंग

Gokul Politics : गोकुळवरून कोल्हापूर पेटलं! शासनाचा पुतळा जाळला, कोल्हापुरात दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर
4

Gokul Politics : गोकुळवरून कोल्हापूर पेटलं! शासनाचा पुतळा जाळला, कोल्हापुरात दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.