Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा; दौंड पंचायत समितीने बजावली कारवाईची नोटीस

दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ५९ बेकायदा होर्डिंगवर दौंड पंचायत समितीने कारवाईचा बडगा उघडला आहे. संबंधित  होर्डिंगधारक मालकांना नोटीस बनवण्यात आली आहे, ही माहिती दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिली.‌

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 18, 2024 | 02:00 PM
अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा; दौंड पंचायत समितीने बजावली कारवाईची नोटीस
Follow Us
Close
Follow Us:
पाटस : दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ५९ बेकायदा होर्डिंगवर दौंड पंचायत समितीने कारवाईचा बडगा उघडला आहे. संबंधित  होर्डिंगधारक मालकांना नोटीस बनवण्यात आली आहे, ही माहिती दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिली.‌
मुंबई येथे बेकायदा होर्डिंग पडल्याने जीवितहानीची दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील प्रशासन खडबडून जाग झाले. पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील जाहिरातीसाठी लावण्यात आलेल्या बेकायदा लोखंडी होर्डिंगवर तातडीने कारवाई करावी, असा आदेश नुकताच काढण्यात आला होता. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील अनेक भागात प्रशासनांने बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
दौंड तालुक्यात पुणे सोलापूर महामार्ग, पाटस-दौंड अष्टविनायक रस्ता, तसेच राज्य आणि जिल्हा मार्गालगत ठिकठिकाणी बेकायदा लोखंडी होल्डिंग उभारण्यात आल्याचे चित्र होते. जाहिरातीसाठी लावण्यात आलेले या लोखंडी होर्डिंग उभारणाऱ्या संबंधित मालकांनी कोणत्याही प्रशासनाची कायदेशीर परवानगी घेतली गेली नसल्याचे आता उघड आले आहे. रस्ता लगत आणि इमारतीवर अनेक ठिकाणी धोकादायक पद्धतीने आणि अपघाताला निमंत्रण देणारे होल्डिंग लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. मागील कित्येक वर्षापासून हे लोखंडी होर्डिंग मालकांनी जाहिरातीवर लाखोंची कमाई केली.
होर्डिंग मालकांचे धाबे दणाणले
आता दौंड पंचायत समितीने कारवाई करण्यास सुरुवात केल्याने या होर्डिंग मालकांचे धाबे दणाणले आहेत. दौंड तालुक्यातील सहजपूर, बोरीपार्धी, बिरोबावाडी, सोनवडी, वाखारी, वासुंदे, देउळगावगाडा, भांडगाव, यवत, पाटस, बोरीभडक व कुरकुंभ या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सुमारे ५९ बेकायदा होर्डिंग मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये फक्त पाटस ग्रामपंचायत हद्दी मध्येच २२ बेकायदा होर्डिंग धारक आहेत. नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत संबंधित होर्डिंग मालकांनी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दौंड तालुका ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदा होर्डिंग मालकांवर पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ठोस अशी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे,अशी माहिती काळे यांनी दिली.

Web Title: Take action against unauthorized hoardings notice of action issued by daund panchayat samiti nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2024 | 02:00 PM

Topics:  

  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Patas
  • Pune

संबंधित बातम्या

Pune News: धंगेकरांचा नवीन बॉम्ब! पुण्यातील आणखी एक जैन हॉस्टेल घोटाळा उघड; म्हणाले, “एखाद्या टोळीच्या…”
1

Pune News: धंगेकरांचा नवीन बॉम्ब! पुण्यातील आणखी एक जैन हॉस्टेल घोटाळा उघड; म्हणाले, “एखाद्या टोळीच्या…”

Asim Sarode : असीम सरोदेंची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचा निर्णय
2

Asim Sarode : असीम सरोदेंची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचा निर्णय

Pune Municipal Voter List : मतदार यादीवर अदृश्य हात कोणाचा? हेराफेरी केल्याचे आरोप
3

Pune Municipal Voter List : मतदार यादीवर अदृश्य हात कोणाचा? हेराफेरी केल्याचे आरोप

Palghar News: मत्स्यव्यवसाय विभागाचा इशारा; चंदेरी पापलेटच्या संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक
4

Palghar News: मत्स्यव्यवसाय विभागाचा इशारा; चंदेरी पापलेटच्या संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.