Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Riots News: नागपूर दंगल, भाजप कार्यकर्त्यांचा रोष अन् नागपूरमध्ये पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

17 मार्च 2025 रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे संपूर्ण शहरात पडसाद उमटले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 02, 2025 | 04:48 PM
Nagpur Riots News: नागपूर दंगल, भाजप कार्यकर्त्यांचा रोष अन् नागपूरमध्ये पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली
Follow Us
Close
Follow Us:

Nagpur Riots News: औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती. या दंगलीदरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. परिस्थिती तणावपूर्ण असताना आणि संभाव्य अनुचित घटनेची पूर्वकल्पना असूनही, पोलिसांनी ही परिस्थिती योग्य पद्धतीने स्थिती हाताळली नाही, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची बाजू घेतली. मात्र, मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके आणि भाजप कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. विशेषतः तहसील पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सिंग यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांचा तीव्र रोष होता. या पार्श्वभूमीवर, संजय सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे ही बदली त्यांना त्या कारवाईची किंमत चुकवावी लागल्याची चर्चा पोलिस वर्तुळात रंगली आहे.

BJP President: ‘या’ तारखेला भाजपला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? भाजपची घटना काय सांगते? कोणाची नावे चर्चेत

17 मार्च 2025 रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे संपूर्ण शहरात पडसाद उमटले. सायंकाली सातच्या दरम्यान, एका जमावाने मोठा गोंधळ घालण्यास सुरूवात केली. महाल परिसरासह आसपासच्या  परिसरात तुफान दगडफेक, गाड्यांची जाळपोळ आणि पोलिसांवर हल्ले झाले, त्यामुळे परिस्थिती चिघळली. वाढता तणाव पाहता शहरात जमावबंंदीचे आदेश लागू  करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी सुमारे 1200 जणांविरुद्ध गुन्हे दाखल कऱण्यात आले. मुख्य आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ही महापालिकेने बुलडोजर कारवाईद्वारे त्याचे घर जमीनदोस्त केले.

पोलिस आणि राज्य शासनाच्या वतीने मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसच्या सत्यशोधन समितीनेही हा आरोप करत, “मुस्लिम समाजाच्या व्यक्तींवरच गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र आंदोलन भडकवणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही,” असा आक्षेप नोंदवला आहे.

मलेशियातील हिंदू मंदिरांवर संकट; 2300 हून अधिक मंदिरे धोक्यात, पुरोहितांची मोठी सभा

या दंगलीला हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या दंगलीत जखमी झालेल्या इरफान अन्सारी या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या तीन ते चार कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले. त्यामुळे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके संतप्त झाले. त्यांनी रात्रीच तहसील पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारला.हे प्रकरण शांत झाल्यानंतर लगेचच तहसील ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, त्यामुळे या बदल्या मागील कारणांबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Tehsil police station inspector sanjay singh transferred abruptly in nagpur riot case nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • Nagpur Violence

संबंधित बातम्या

Nagpur Violence: पोलिसांशी वाद, हल्ल्याच्या ठिकाणी हालचाली…; नागपूर हिंसाचारातील तिसऱ्या आरोपीला अटक
1

Nagpur Violence: पोलिसांशी वाद, हल्ल्याच्या ठिकाणी हालचाली…; नागपूर हिंसाचारातील तिसऱ्या आरोपीला अटक

Nagpur Violence: ‘दोन समाजात तेढ…’; सोशल मिडिया वापरणाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी दिली सक्त ताकीद
2

Nagpur Violence: ‘दोन समाजात तेढ…’; सोशल मिडिया वापरणाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी दिली सक्त ताकीद

Husain Dalwai on Nagpur Violence:  नागपूरच्या हिंसाचारात पहिली चूक पोलिसांची…; हुसेन दलवाईंनी स्पष्टचं सांगितलं
3

Husain Dalwai on Nagpur Violence: नागपूरच्या हिंसाचारात पहिली चूक पोलिसांची…; हुसेन दलवाईंनी स्पष्टचं सांगितलं

Nagpur Violence : ‘पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?’; जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
4

Nagpur Violence : ‘पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?’; जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.