Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्थ पवार संबंधित मुंढवा भूखंड गैरव्यवहारप्रकरणात मोठी कारवाई; ‘या’ दोन अधिकाऱ्यांना सेवेतूनच केले बडतर्फ

मुंढवा येथील सुमारे ४० एकर सरकारी जमीन खासगी कंपनीला हस्तांतरित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. संबंधित जमिनीचा व्यवहार अंदाजे ३०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जाते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 15, 2026 | 12:39 PM
पार्थ पवार संबंधित मुंढवा भूखंड गैरव्यवहारप्रकरणात मोठी कारवाई; 'या' दोन अधिकाऱ्यांना सेवेतूनच केले बडतर्फ

पार्थ पवार संबंधित मुंढवा भूखंड गैरव्यवहारप्रकरणात मोठी कारवाई; 'या' दोन अधिकाऱ्यांना सेवेतूनच केले बडतर्फ

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदार सुर्यकांत येवले आणि उपनिबंधक रविंद्र तारू यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता या दोन्ही अधिकाऱ्यांना थेट शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाने दोन्ही अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

पुण्यातील मुंढवा परिसरातील पार्थ अजित पवार यांच्याशी संबंधित बहुचर्चित जमीन व्यवहार प्रकरणात राज्य सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. या व्यवहारात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत महसूल विभागातील या दोन्हीही अधिकाऱ्यांना सेवेतून कमी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनस्तरावर अंतिम आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंढवा येथील सुमारे ४० एकर सरकारी जमीन खासगी कंपनीला हस्तांतरित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. संबंधित जमिनीचा व्यवहार अंदाजे ३०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जाते. या व्यवहारात नियमबाह्य पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्याचा तसेच स्टँप शुल्कात मोठी तफावत झाल्याचा आरोप आहे. वास्तविक, हा भूखंड १८०० कोटी रूपयांचा असल्याचा अंदाज आहे.

हेदेखील वाचा : मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक

या प्रकरणी तत्कालीन उपनिबंधक तारू आणि तहसीलदार येवले या दोन अधिकाऱ्यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. प्राथमिक चौकशीत त्यांच्या कार्यपद्धतीत गंभीर त्रुटी आढळल्याचे समोर आले. त्यानंतर सविस्तर चौकशी अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. या अहवालाच्या आधारे आता संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची केली होती चौकशी

राज्य सरकारने या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली होती. समितीने संबंधित कागदपत्रे, परवानग्या, जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया आणि महसूल नोंदींचा तपशीलवार अभ्यास केला. नियमांचे पालन न झाल्याचे आणि शासकीय हितास बाधा पोहोचल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आल्याचे समजते.

राजकीय वातावरण तापले

या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापले होते. विरोधकांनी सखोल चौकशीची मागणी केली होती, तर सरकारने दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. आता दोन अधिकाऱ्यांवर होणारी संभाव्य बडतर्फी ही त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. प्रकरणातील इतर पैलूंची चौकशी सुरू असून, आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Tehsildar suryakant yewle and deputy registrar ravindra taru were dismissed from service in mundhwa plot scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • Scam Case

संबंधित बातम्या

Coal Scam Case: कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई! १०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त
1

Coal Scam Case: कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई! १०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.