तेजस उद्धव ठाकरे यांचा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या पार्टीमध्ये डान्स
मुंबई : मुंबईमध्ये सध्या अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. येत्या 12 जुलै रोजी त्यांचा दिमाखदार विवाह सोहळा शाही थाटात पार पडणार आहे. त्यांच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. अंबानी कुटुंबातील या लग्नाची चर्चा देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये आहे. अनंत व राधिका यांच्या लग्नाचे संगीत व हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे. अंबानींच्या संगीत सोहळ्याला अनेक सिने कलाकारांनी उपस्थिती लावली होती. कलाकारांचे फोटो व व्हिडिओ देखील समोर आल्या आहेत. मात्र सध्या उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे यांच्या अंबानी पार्टीमधील डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. मात्र विरोधकांनी यावरुन निशाणा साधला आहे.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा पार पडला. यावेळी क्रिकेटर, सिने अभिनेते, अभिनेत्री, निर्माते व मोठ्या उद्योगपतींनी उपस्थिती लावली होती. अनेकांच्या लुकची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तसेच राजकीय वर्तुळामध्ये मात्र उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांच्या डान्सची चर्चा रंगली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेजस ठाकरे हे ब्लॅक कलरचा शेरवानी सुट घालून नाचत आहे. त्यांच्यासोबत अभिनेत्री सारा अली खान, मानुषी छिल्लर, ऑरी असे अनेक सुप्रसिद्ध बॉलीवूड स्टार नाचत आहेत. ‘ये लडकी हाय अल्ला’ या गाण्यावर तेजस ठाकरे थिरकले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. मात्र विरोधकांनी तेजस ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे.
आता म्हणा तेजस ठाकरेला गुजरातने पळवला…
साला नाच्या ठाकरे. pic.twitter.com/8AGhjDkZ1L
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) July 9, 2024
भाजप नेते निलेश राणे यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर करताना त्यांनी तेजस ठाकरे यांच्यावर जहरी शब्दांमध्ये टीका केली आहे. निलेश राणे म्हणाले, आता म्हणा तेजस ठाकरेला गुजरातने पळवला…साला नाच्या ठाकरे. अशा शब्दांत निलेश राणे यांनी टीकास्त्र डागलं आहे. नितेश राणे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना तेजस ठाकरे यांच्या अंबानी पार्टीतील डान्सवर निशाणा साधला आहे. “रोहित पवार यांनी ड्रायव्हरची नोकरी सोडावी. अडीच वर्ष समृद्धी महामार्ग बाबत गप्प का होते?. पवार यांचा नातू आदानींचा ड्रायव्हर होतो. ठाकरेंचा नातू अंबानीच्या लग्नात नाचतो. एक नातू ड्रायव्हर दुसरा नातू नाच्या परत गुजरात्यांना शिव्या घालायच्या. याला आता नाच्या ठाकरे नाव द्यावं” अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे. राणे बंधुंनी केलेल्या या टीकेवर ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर येणार का याची चर्चा रंगली आहे.