राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...
वर्धा : मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानाने 40 अंश पार केला आहे. त्यामुळे नागरिकांनीही वाढत्या उन्हात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने केले आहे.
मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या उंबरठा ओलांडते. पण, यंदाच्या वर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्याच्या तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडला आहे. 12 मार्चला जिल्ह्याचे तापमान 38 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर गुरूवारी (दि.13) जिल्ह्याच्या तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली. गुरूवारी जिल्ह्याचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर शुक्रवारी (दि.14) तापमानात वाढ होत 41 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
हेदेखील वाचा : PM Modi Cricket : भारत की पाकिस्तान कोणता क्रिकेट संघ अधिक चांगला? पंतप्रधान मोदी काय म्हणाले एकदा ऐकाच
शिवाय शनिवारीही सूर्याने आग ओकल्याने जिल्ह्याचे तापमान 41.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर रविवारी दिवसभर जीवाची काहीली होईल असेच उन्ह होते. रविवारी जिल्ह्याचे तापमान 40.2 नोंदविण्यात आले आहे.
हवामान खात्याचा अंदाज ठरला खरा
हवामान खात्याच्या नागपूर येथील वेधशाळेने उष्णतेच्या लाटेबाबत वर्धा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. हवामान खात्याचा अंदाज खराही ठरला. शनिवारी व रविवारी जीवाची काहीली होईल तसेच अंगाला चटके देणारीच उन्ह वर्धा जिल्ह्यात होती.
हेदेखील वाचा : Amit Shah on Bihar Election: बिहार काबीज करण्यासाठी अमित शहांचा मास्टर प्लॅन: विधानसभेसाठी तळ ठोकण्याची तयारी सुरू