Photo Credit- Social Media बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी अमित शहांचा मास्टर प्लॅन,
पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बिहारच्या राजकारणात वाढत्या हालचालींमुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये अमित शहा म्हणाले होते की, बिहारचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल हे संसदीय मंडळ ठरवेल. त्यानंतर आता बिहारमध्ये निवडणुका जवळ आल्यामुळे ते लवकरच बिहारमध्ये तळ ठोकणार असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्यांदाच शहा यांच्या विधानामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या विधानाबद्दल कोणतीही कुजबुज नव्हती. बिहारमधील एनडीएचा एक प्रमुख घटक पक्ष असलेल्या जेडीयूच्या नेत्यांनाही भाजपच्या मनात काय चालले आहे हे समजत नसल्याचे दिसत आहे. अमित शहा यांच्या घोषणेमुळे भाजप नेते खूप उत्साहित असले तरी, जेडीयूने मात्र मौन राहणे पसंत केलं आह.
अमित शहा यांनी बिहारमध्ये कॅम्पिंग करण्याबद्दल एका प्रसंगी बोलले, त्यावेळी तिथे जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा देखील उपस्थित होते. गुजरातमधील शाश्वत मिथिला महोत्सवात पोहोचलेले अमित शाह म्हणाले होते की, ते आता बिहारमध्ये तळ ठोकणार आहेत. एवढेच नाही तर अयोध्येत राम मंदिर बांधले गेले आहे, आता माता सीतेचे मंदिर मिथिलामध्येही बांधले जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
Jayant Patil : ‘आता बाहेर बोलायचीही चोरी’; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटील असं का म्हणाले?
तीन महिन्यांत बिहारच्या संदर्भात अमित शहा यांचे हे दुसरे विधान आहे. जेव्हा त्यांनी पहिल्यांदाच एनडीएच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत विधान केले तेव्हा जेडीयू नेत्यांवर त्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्या विधानानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मौन बाळगल्यामुळे सस्पेन्स आणखी वाढला. यामुळे नाराज झालेले नितीश कुमार महाआघाडीकडे वळतील अशी अटकळ सुरू झाली. पण जवळजवळ पंधरा दिवसांनंतर नितीश यांनी आपले मौन सोडले, आपण राजदसोबत जाण्याची चूक पुन्हा करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं.
गुलाबी वचनं तर दिली पण पूर्ण करणार कोण? तिजोरीचा खणखणाट नेत्यांच्या कानाला झालाय नकोसा
अमित शहा यांना भाजपचे निवडणूक रणनीतीकार म्हटले जाते. राज्यांमध्ये भाजपच्या सातत्यपूर्ण विजयामागे शाह यांची रणनीती हे मुख्य कारण राहिले आहे. २०१७ च्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सुमारे दोन वर्षांआधीच त्यांनी तिथे तळ ठोकला होता. बूथ पातळीवर त्यांचे निवडणूक व्यवस्थापन बरेच प्रभावी होते. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर जर ते बिहारमध्ये आपला तळ ठोकणार असतील तर त्यामागील त्यांची राजकीय खेळी माहिती असणे गरजेचे आहे.