Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मशवी गावाव्हाळ येथे खाजगी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, अपघातामध्ये तिघे जखमी

अपघात झाल्यावर जखमींना आचरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले.

  • By सुरुची कदम
Updated On: May 08, 2024 | 05:02 PM
मशवी गावाव्हाळ येथे खाजगी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, अपघातामध्ये तिघे जखमी
Follow Us
Close
Follow Us:

देवगड: आचरा देवगड रस्त्यावर मशवी गावाव्हाळ येथील अवघड वळणावर खाजगी बसने दहिबावच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षेला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की रिक्षामध्ये उजव्या बाजूस बसलेल्या नऊ वर्षाच्या मुलाचा उजवा पायांचे दोन तुकडे झालेत. रिक्षातील मुलाचे आईवडीलही जखमी झालेत. अपघात झाल्यावर जखमींना आचरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले. या अपघात झाल्याचे समजल्यानंतर देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस विजय बिर्जे, सागर चौगले घटनास्थळी दाखल झाले होते.

या अपघातात रिक्षामधील रुद्र लवू घाडी वय 9, लवू धोंडू घाडी वय 45, रुचिता लवू घाडी 40 रा सर्व दहिबाव हे गंभीर जखमी झालेत. तर रिक्षा चालक रिक्षा वसंत गोविंद परब रा पोईप यांना किरकोळ दुखापत झाली.दहिबाव येथील लवू घाडी हे आपल्या कुटुंबासोबत पत्नीच्या माहेरी मालडी येथे काही दिवसापूर्वी गेले होते. ते मालडी येथून बुधवारी सकाळी आचरा मार्गे देवगड- दहीबांव येथे पोईप येथील रिक्षाने मालडी येथून पत्नी रुचिता व मुलगा रुद्र यांच्या समवेत जात होते.

सकाळी साडे नऊच्या सुमारास आचरा देवगड रस्त्यावर माशवी गावव्हाळ येथील अवघड वाळणावर आले असता समोरून आचराच्या दिशेने येणाऱ्या आराम बसने (आराम बस नंबर MH04 GP. 1875) रिक्षेच्या (रिक्षा नंबर MHO7 F 2115) उजव्या बाजूला जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की काही अंतर रिक्षा फरफटत जाऊन कलंडली. धडकेत उजव्या बाजूला बसलेला रुद्र घाडी याचा उजवा पाय रिक्षा आणि आरामबसचा भागात सापडल्याने पायाचे दोन तुकडे झालेत. तर रिक्षातील लवू घाडी व रुचिता यांनाही डोक्याला व कानाच्या मागे गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर आराम बस चालक बस तेथेच टाकून पसार झाला होता.

Web Title: Terrible accident involving a private bus and a rickshaw at mashvi gavaval three injured in the accident crime nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • Devgad
  • kokan
  • Riksha

संबंधित बातम्या

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार
1

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

श्वानांना खरंच भुतं दिसतात का? काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या
2

श्वानांना खरंच भुतं दिसतात का? काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या

Konkan Rain Alert: पुढील २४ तास कोकणासाठी अत्यंत धोक्याचे; उंचच उंच लाटा अन्…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता
3

Konkan Rain Alert: पुढील २४ तास कोकणासाठी अत्यंत धोक्याचे; उंचच उंच लाटा अन्…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता

Kokan Rain Alert: पुढील २४ तास कोकणकरांसाठी अत्यंत महत्वाचे; उंच लाटांचा इशारा अन्…
4

Kokan Rain Alert: पुढील २४ तास कोकणकरांसाठी अत्यंत महत्वाचे; उंच लाटांचा इशारा अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.