रत्नागिरी – राज्यात जून २०२२ मध्ये सत्तांतर झाले आहे. शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गटाने (Shinde Group) बंड करत भाजपासोबत (BJP) सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, एकिकडे शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिले आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्षाची लढाई न्यायालयात प्रलंबित आहे. सोळा आमदार अपात्र यावर १६ मे रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वाचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. मात्र या दोन्ही गटातील नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरुच आहे. तर ठाकरे गटातील नेते शिंदे गटात प्रवेश करत असताना, आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. रत्नागिरी नगरपंयातमधील राजकारण तापले आहे. (Ratnagiri Nagar Panchayat)
उपनगराध्यांवर अविश्वास ठराव…
दरम्यान, लांजा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांच्यावर शिवसेनेने (शिंदे गट गटाने) अविश्वास ठराव दाखल केला असून आज (सोमवारी 17 एप्रिल) मतदान होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांना पदावरुन हटवण्यासाठी शिंदे गटाकडून अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. पूर्वा मुळे या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्ष आहेत.
कसे आहे पक्षीय बलाबल?
दरम्यान, पूर्वा मुळे यानी 15 सदस्यांना व्हीप बजावल्याने लांजातील राजकारण तापलं आहे. या अविश्वास ठरावाच्या घडामोडीवर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे सदस्य सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. पण सध्या नगरपंचायतीत पक्षीय बलाबल पाहिले तर शिवसेना ठाकरे गटाचे 15 सदस्यसह गटनेते पद हे पूर्वा मुळे यांच्याकडे आहे. त्या सध्या उपनगराध्यक्ष आहेत. नगराध्यक्ष मनोहर बाईत याच्यासह 10 जणांनी भाजपचे दोन सदस्य घेऊन वेगळा गट तयार केला आहे. उपनगराध्यक्षसाठी भाजपचे संजय यादव, मंगेश लांजेकर आणि शिंदे गटाचे सचिन डोंगरकर हे दावेदार आहेत. दोन अपक्ष आणि काँग्रेस दोन सदस्य हे पूर्वीच्या 15 जणांच्या गटात आहेत.
दिग्गजांकडून बारकाईनं लक्ष…
अविश्वास ठरावामुळं ठाकरे गटाला आणखी एक हादरा बसला आहे. त्यामुळं येथे आपले वर्चस्व राखण्यासाठी ठाकरे गटाचे नेते ठांण मांडून बसले आहेत. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी, संदीप दळवी, जगदीश राजापकर हे आक्रमक झाले असून, प्रत्येक घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे सामंत गट, राणेंसह बड्या नेत्यांनी लांजातील नगर पंचायत हालचालींवर लक्ष केंद्रित केलं आहे.