Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान

ठाण्यात पावसामुळे दरड कोसळल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर येथे आज दरड कोसळल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झालं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 19, 2025 | 03:42 PM
Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान
Follow Us
Close
Follow Us:
  • मुसळधार पावसामुळे कोसळली दरड
  • आपत्ती व्यवस्थापनाचं बचावकार्य युद्धपातळीवर
  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचपाार्श्वभूमीवर ठाण्यात पावसामुळे दरड कोसळल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर येथे आज दरड कोसळल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झालं आहे.

या दुर्घटनेत जय मातेरे यांच्या घराचे नुकसान झाले तर परिसरातील चार घरं सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पालिकेने तात्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले. या दुर्घटनेत ७० वर्षीय वृद्ध जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती कळताच महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, अतिक्रमण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. पालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाने बचावकार्य युद्धपातळीवर केलं.

दरड कोसळली त्या परिसरात पालिकेने नागरिकांच्या रहदारीवर बंदी घातली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही. मात्र खबरदारीच्या दृष्टीने इतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास पालिकेने आवाहन केले आहे. या दुर्घटनेबाबत पुढील कार्यवाही लोकमान्य प्रभाग समितीमार्फत सुरू आहे. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दल सतत सज्ज आहे. दरड कोसळल्यानंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून, महापालिकेने तातडीने उपाययोजना करत जीवितहानी टळली आहे.

याचबरोबर रामनगर, वागळे इस्टेट,  या ठिकाणी देखील रस्त्यावरती लोखंडी कमान कोसळली.  घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी १ जेसीबी मशीन सह, अग्निशमन दलाचे जवानांनी ही कोसळलेली लोखंडी कमान बाजूला केली आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत  देखील कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पुढील 48 तास ठाणे जिल्हाला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील खाडी आणि नदी / नाला इ. पाण्याकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षा 022- 25301740 किंवा 9372338827 या क्रमांकावर अथवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.आज सकाळी 6.30 वाजल्यापासून ते 11.30 पर्यंत म्हणजेच मागील पाच तासात 40 एमएम इतकी ठाण्यात पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गरज असेल तरंच घराबाहेर पडा असं आवाहन देखील ठाणेपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे.

Web Title: Thane news heavy rains cause landslide in lokmanya nagar major damage to citizens houses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • Marathi News
  • Thane news
  • Thane rain updates

संबंधित बातम्या

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
1

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Palghar News : स्वच्छ भारत सुंदर भारत ; महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यावरवरील खड्डे
2

Palghar News : स्वच्छ भारत सुंदर भारत ; महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यावरवरील खड्डे

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”
3

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या
4

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.