Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : राम गणेश गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच होणार रसिकांसाठी खुले

ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या वास्तूचे नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच रसिकांसाठी रंगायतन खुले होणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 06, 2025 | 05:57 PM
Thane News : राम गणेश गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच होणार रसिकांसाठी खुले
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या वास्तूचे नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच रसिकांसाठी रंगायतन खुले होणार आहे. त्यापूर्वी, पूर्ण होत आलेल्या कामांची पाहणी बुधवारी ज्येष्ठ कलाकार, निर्माते आणि पदाधिकारी यांनी केली. नुतनीकरणाच्या झालेल्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले असून लवकरात लवकर या रंगमंचावर प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक अशोक हांडे, निर्माते दिलीप जाधव, निर्माते प्रसाद कांबळी यांच्यासह ठाण्यातील नाट्यकर्मी अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, दिग्दर्शक विजू माने यांनी रंगायतनची पाहणी केली. त्यावेळी, उपायुक्त उमेश बिरारी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते.

गडकरी रंगायतनमध्ये रंगमंच, आसन व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, रंगपट, स्टेजच्या मागची बाजू, सेट आणण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे यांच्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्याचा निर्णय स्तुत्य आहेच. त्यासोबत, रंगायतनच्या तळमजल्यावर नाटकासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्थाही करावी, अशी सूचना आजच्या पाहणीत करण्यात आली. तसेच, पार्किंग व्यवस्था, तालीम हॉल, तिकिट खिडकी, नाटकांचे फलक लावण्यासाठी असलेली जागा यांचीही पाहणी केली.

गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जुन्या वास्तूला असलेल्या मर्यादा सांभाळून शक्य तेवढ्या जास्तीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज झालेल्या पाहणीच्या वेळी कलाकार, निर्माते यांनी केलेल्या सूचनांचीही महापालिकेने नोंद घेतली आहे. त्यावर तत्काळ कार्यवाही करून लवकरात लवकर रंगायतन नाट्यरसिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले.

गडकरी रंगायतनच्या कामाची आज पुन्हा पाहणी केली. काम चांगले झाले आहे. ध्वनी आणि प्रकाश योजनाही व्यवस्थित आहे. रंगपट आणि बॅक स्टेजला काही सुधारणा सुचवल्या आहेत. आता लवकरात लवकर या रंगमंचावर प्रयोग करण्याची संधी मिळू देतं, अशी प्रतिक्रिया अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे.

प्रकाशयोजनेबद्दल काही सूचना आजच्या पाहणीत केल्या आहेत. नुतनीकरणाचे उर्वरीत काम चांगले झाले आहे. वास्तू आकर्षक झाली आहे. त्यात आता प्रयोगाचे रंग लवकर भरले जावेत, असं ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक अशोक हांडे यांनी सांगितलं आहे.
पहिल्या पाहणीच्या वेळी केलेल्या सूचनांची व्यवस्थित अमलबजावणी झाल्याचे पाहून चांगले वाटले. नुतनीकरणाचे काम योग्य पद्धतीने झाले आहे. ज्या काही एक-दोन गोष्टी होत्या त्याही आजच्या पाहणीनंतर पूर्ण करण्याचा शब्द महापालिकेने दिला आहे, असं निर्माते प्रसाद कांबळी यांनी म्हटलं आहे.

गडकरी रंगायतनला आज भेट दिल्यावर आनंद वाटला. नुतनीकरणासाठी थोडा वेळ लागला असला तरी ते काम चांगले झाले आहे. रंगमंचापासून ते आसनव्यवस्थेपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या जुळून आल्या आहेत अशी भावना अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई यांनी व्यक्त केली आहे. ठाणे शहराची ओळख असलेली ही वास्तू चांगली होण्यासाठी उत्तम काम झाले आहे. सूचनांची अमलबजावणी झालेली आहे. या वास्तूचे वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वजणांचे मनापासून कौतुक आहे.दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Thane news renovation work of ram ganesh gadkari rangayatan in final stage will be open for fans soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • Marathi News
  • thane

संबंधित बातम्या

Amravati उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान
1

Amravati उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान

SINDHUDURG : सिंधुदुर्गातील नेरूरचे गावडे घराण्याचे अनोखे गणपती उत्सव! जागतिक विक्रम बुकमध्ये नोंद
2

SINDHUDURG : सिंधुदुर्गातील नेरूरचे गावडे घराण्याचे अनोखे गणपती उत्सव! जागतिक विक्रम बुकमध्ये नोंद

Amravati : पाणी, स्वच्छता, शिक्षणाचे महत्व सांगणारा गणेश मंडळाचा अंधश्रद्धा निर्मूलनावर देखावा
3

Amravati : पाणी, स्वच्छता, शिक्षणाचे महत्व सांगणारा गणेश मंडळाचा अंधश्रद्धा निर्मूलनावर देखावा

Navi Mumbai :  मनोज जरांगे यांच्या तब्येतीवरून मराठा आंदोलक संतप्त
4

Navi Mumbai : मनोज जरांगे यांच्या तब्येतीवरून मराठा आंदोलक संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.