Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : अनधिकृत बांधकामावर विशेष पथकाची करडी नजर; महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश

अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी, दिवा आणि मुंब्रा या भागावर देखरेख करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष पथक निर्माण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 24, 2025 | 03:47 PM
Thane News : अनधिकृत बांधकामावर विशेष पथकाची करडी नजर; महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे / स्नेहा जाधव,काकडे : अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी, दिवा आणि मुंब्रा या भागावर देखरेख करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष पथक निर्माण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामांच्या अधिक तक्रारी आहेत. त्याची शहानिशा करण्यासाठी तसेच देखरेख करण्यासाठी या विशेष पथकाची निर्मिती केली जाणार असल्याचे, आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.

अनधिकृत असलेली घरं किवा इमारतींवर गणेशोत्सव काळात कोणतीही कारवाई केली जाणार नाही. महापालिका क्षेत्रातील या कारवाईचा आढावा महापालिका आयुक्त राव यांनी शनिवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत घेतला.

Thane News : ठाण्यातील राजकारणात मोठी उलथापालथ; रिपाई राष्ट्रीय अध्यक्षपदी नानासाहेब इंदिसे यांची निवड

या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, नगररचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांच्यासह विभागप्रमुख, सर्व उपनगर अभियंता, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी बैठकीत कर्मयोगी पोर्टल, १५० दिवसांचा कार्यक्रम आदी विषयांबाबत सादरीकरण केले. उपायुक्त शंकर पाटोळे यांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची माहिती दिली. तर, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी गणेश मूर्ती कार्यशाळा आणि विसर्जन व्यवस्था याची माहिती दिली.

उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई सुरू आहे. आतापर्यंत २२७ बांधकामांवर कारवाई झाली असून २४ गुन्हे दाखल झाले आहेत. या कामात अडथळा आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले.

Thane News : गरजू विद्यार्थ्यांना शिंदेगटाचा मदतीचा हात; शिवसेनेच्या प्रयत्नांनी ५१ लाखांचे अर्थसहाय्य

विसर्जन व्यवस्थेचा आढावा

या बैठकीत, गणेशोत्सव आयोजन आणि विसर्जन व्यवस्था यांचाही आयुक्त राव यांनी आढावा घेतला. यावर्षी, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित केल्या जाणार आहेत. त्यामुळे कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच, फिरती विसर्जन पथके अधिक करून मोठमोठ्या गृहसंकुलात विसर्जनाची फिरती पथके जातील याची व्यवस्था केली असल्याने त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त राव यांनी केले.

धोकादायक इमारती रिक्त करा

पावसाळ्यातील आताचा काळ धोकादायक इमारतींसाठी कसोटीचा असतो. त्यामुळे अजूनही ज्या अतिधोकादायक इमारतींमध्ये नागरिक राहत आहेत त्या इमारती तातडीने रिक्त करून त्या सील कराव्यात. त्याचा ताबा पुन्हा रहिवाशांनाच दिला जाईल, असा विश्वास त्या नागरिकांना द्यावा, असे आयुक्त राव यांनी पुन्हा स्पष्ट केले.

Web Title: Thane news special team keeps a close watch on unauthorized construction municipal commissioner saurabh rao gives instructions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • Thane news
  • Unauthorized buildings

संबंधित बातम्या

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात
1

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

मनपा शाळेतील मुलं ठरली अव्वल! बॉक्सिंगमध्ये मिळवला सुवर्णपदक, कामगिरी अशी की थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
2

मनपा शाळेतील मुलं ठरली अव्वल! बॉक्सिंगमध्ये मिळवला सुवर्णपदक, कामगिरी अशी की थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल
3

Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली
4

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.