Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: ठाणेकरांचा इंग्लंडमध्ये डंका; इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर पार करणाऱ्या जलतरणपट्टूंचा सन्मान

ठाणेकरांची मान अभिमानानं उंचावणारी घटना ठाण्यात घडली आहे, ठाण्यातील तीन जलतरण पट्टूंच्या अथक प्रयत्नांने आता इंग्लंड येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी बोलवण्यात आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 01, 2025 | 04:59 PM
Thane News: ठाणेकरांचा इंग्लंडमध्ये डंका; इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर पार करणाऱ्या जलतरणपट्टूंचा सन्मान
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव काकडे: वेगाने वाहणारा वारा.. अंधार.. समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे 46 कि.मी.चे सागरी अंतर यशस्वीपणे पार करुन ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मानव मोरे, आयुष तावडे व आयुषी आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचा सन्मान करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे हे ‍तिन्ही जलतरणपटू नियमित सराव करीत आहे. मानव मोरे, आयुष तावडे, आयुषी आखाडे या तिन्ही जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स (English Channel) हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होवून पार केले. Pride of India चे A व B हे दोन भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेले होते. Pride of India च्या A संघामध्ये ठाण्याच्या मानव राजेश मोरे वय वर्षे 20 याची तर Pride of India च्या B संघामध्ये आयुष प्रवीण तावडे वय वर्षे 15 व आयुषी कैलास आखाडे वय वर्षे 14 यांची निवड झाली होती.

16 जून 2025 रोजी Pride of India च्या A मधील जलतरणपटूंनी इंग्लीश खाडी पोहण्यास सुरूवात केली. या संघातील मानव राजेश मोरे यांनी 46 कि.मी.चे सागरी अंतर रिले पध्दतीने 13 तास 37 मिनिटात पूर्ण केले. तर 18 जून रोजी Pride of India च्या B च्या संघातील आयुष प्रवीण तावडे वय वर्षे 15 व आयुषी कैलास आखाडे वय वर्षे यांनी हे अंतर 11 तास 1‍9 मिनिटात पूर्ण केले. या तिन्ही जलतरणपटूंचे आज खासदार नरेश म्हस्के यांनी कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तिन्ही जलतरणपटू इंग्लंडला जाण्यापूर्वी नियमित ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा सराव करीत होते. तसेच इंग्लंड, फ्रान्स येथील वातावरणाचे तापमान लक्षात घेवून त्याची सवय व्हावी या दृष्टीने खाजगी तरणतलावात बर्फाच्या लाद्या टाकून जलतरणाचा सराव केला. अथक मेहनत आणि नियमित सराव यामुळेच हे यश प्राप्त केले असल्याचे तिन्ही जलतरणपटूंनी सांगितले. यावेळी त्यांचे पालक रुचिता मोरे, राजेश मोरे, प्रवीण तावडे, कैलास आखाडे उपस्थित होते.

‘ती’च्या जिद्दीला सलाम
आयुषी कैलास आखाडे या 14 वर्षीय जलतरणपटूला इंग्लंड येथे जाण्यापूर्वी पायाला दुखापत झाली होती. तिच्या पायाला 11 टाके पडल्यामुळे तिचा सराव पूर्णपणे बंद झाला होता. पायाची जखम जेमतेम भरली असल्याने तिला डॉक्‌टरनी पोहण्यास परवानगी दिली. ‍तिने जिद्दीने हे सागरी अंतर 11 तास 19 मिनीटात पूर्ण केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Web Title: Thane news thane residents rowing in england swimming boats crossing the sea from england to france honored

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 04:57 PM

Topics:  

  • Sports
  • Swimming
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध
1

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Prithvi Shaw: पृथ्वी शॉचे शतक आणि त्यानंतर मुशीर खानसोबत भांडण; भर मैदानात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ Viral
2

Prithvi Shaw: पृथ्वी शॉचे शतक आणि त्यानंतर मुशीर खानसोबत भांडण; भर मैदानात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ Viral

Ab Devilliers on Rohit-Kohli: रोहित-कोहलीच्या भविष्यावर डिव्हिलियर्सचे खळबळजनक विधान; भारतीय चाहत्यांना हे वक्तव्य पचणार नाही!
3

Ab Devilliers on Rohit-Kohli: रोहित-कोहलीच्या भविष्यावर डिव्हिलियर्सचे खळबळजनक विधान; भारतीय चाहत्यांना हे वक्तव्य पचणार नाही!

IND vs WI 2nd Test: दिल्लीच्या मैदानावर टीम इंडियाची कशी आहे कामगिरी? कधी खेळला गेला होता शेवटचा कसोटी सामना? वाचा एका क्लिकवर
4

IND vs WI 2nd Test: दिल्लीच्या मैदानावर टीम इंडियाची कशी आहे कामगिरी? कधी खेळला गेला होता शेवटचा कसोटी सामना? वाचा एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.