Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मतांसाठी भिक मागायला येणारे…” अंबरनाथच्या शास्त्रीनगर भागातील पाणीटंचाईवरून नागरिकांचा राजकीय पुढाऱ्यांवर संताप

अंबरनाथ शहरातील शास्त्रीनगर भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 27, 2025 | 06:47 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील स्वामी नगर परिसरातील शास्त्रीनगर या दाट लोकवस्तीच्या भागात मागील काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना शहरातील स्टेशन परिसरापर्यंत पायी जावे लागत आहे, तर काहींना शेजाऱ्यांकडे किंवा ओळखीच्या लोकांकडे विनंती करून पाणी भरावे लागत आहे.

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून शास्त्रीनगरमध्ये पाण्याचा पुरवठा अत्यंत अनियमित झाला आहे. कधी दिवसानुदिवस नळ कोरडे राहतात, तर कधी दोन मिनिटांसाठी आलेले पाणी सर्वांना पुरेसे पडत नाही. या परिस्थितीमुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे हाल होत आहेत. महिलांना घरगुती कामे, स्वयंपाक आणि स्वच्छतेसाठी पाण्याची कमतरता भासत आहे.

पंढरपूर तालुक्यात ऑक्टोबर छाटणीची धांदल सुरु; दहा ते पंधरा वर्षात द्राक्ष बागांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ

या भागातील रहिवाशांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे, शहरात नगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. भावी तसेच माजी नगरसेवक प्रचाराच्या तयारीत गुंतलेले दिसत आहेत. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही, असा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. “निवडणुकीच्या वेळी मतांसाठी आमच्या दारात येणारे नेते आज आमच्या पाणी समस्येकडे डोळेझाक करत आहेत,” असा संतप्त सूर रहिवाशांनी व्यक्त केला.

Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट; स्वेटर काढा अन् रेनकोट घाला, वादळी वारे, विजांसह…

स्थानिक प्रशासन आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा “लवकरच तोडगा काढू” असे आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्षात पाण्याचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. शास्त्रीनगर परिसरातील अनेक नागरिक हे नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज परिश्रम करणाऱ्या या कामगारांना स्वतःच्या घरात पिण्याचे आणि अंघोळीचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे., त्यामुळे प्रशासनाने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढवा अशी अपेक्षा स्थानिक नागरिक नुरेमान शेख यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Thane news water crisis in ambernath shastri nagar people got angry on political leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 06:45 PM

Topics:  

  • Ambernath
  • Thane news
  • Water problem

संबंधित बातम्या

Raj Thackeray in Thane Court : राज ठाकरे ठाणे कोर्टात दाखल; मला गुन्हा कबुल नाही…’ म्हणून स्पष्टच सांगितलं
1

Raj Thackeray in Thane Court : राज ठाकरे ठाणे कोर्टात दाखल; मला गुन्हा कबुल नाही…’ म्हणून स्पष्टच सांगितलं

भूमीपुत्रांच्या जागा घेऊनही विकास नाही; KDMC प्रशासनावर माजी नगरसेवक मयूर पाटील यांचा संतप्त सवाल
2

भूमीपुत्रांच्या जागा घेऊनही विकास नाही; KDMC प्रशासनावर माजी नगरसेवक मयूर पाटील यांचा संतप्त सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.