Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajendra Lodha ED Arrest: राजेंद्र लोढांच्या अटकेवर हायकोर्टाचे ताशेरे; विनोद पाटील यांच्या ईडी चौकशीचीही पुन्हा चर्चा

Rajendra Lodha ED Arrest: लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांच्या PMLA अंतर्गत अटकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने ईडीच्या कार्यपद्धतीवर कठोर निरीक्षणे नोंदवत कोठडीचे आदेश रद्द केले आणि जामीन मंजूर केला. या प्रकरणाच्या तपासात मनसे नेते विनोद पाटील यांच्याशी संबंधित ठिकाणी ईडीने शोधमोहीम राबवून त्यांची चौकशी केली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 24, 2026 | 02:27 PM
राजेंद्र लोढांच्या अटकेवर हायकोर्टाचे ताशेरे; विनोद पाटील यांच्या ईडी चौकशीचीही पुन्हा चर्चा

राजेंद्र लोढांच्या अटकेवर हायकोर्टाचे ताशेरे; विनोद पाटील यांच्या ईडी चौकशीचीही पुन्हा चर्चा

Follow Us
Follow Us:
  • लोढांची PMLA कोठडी रद्द
  • विनोद पाटील यांच्या चौकशीबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा
  • राजेंद्र लोढांना हायकोर्टाचा दिलासा
  • आता विनोद पाटील यांच्या ईडी चौकशीकडे पुन्हा लक्ष
Rajendra Lodha ED Arrest: लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक राजेंद्र नरपतमल लोढा यांच्या अटकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्यानंतर या प्रकरणातील ईडीच्या तपासाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने 21 सप्टेंबर 2026 रोजी लोढा यांच्यावरील PMLA अंतर्गत अटकेच्या प्रक्रियेत कायदेशीर त्रुटी असल्याचे नमूद केले. न्यायालयाने त्यांची कोठडी रद्द करून 5 लाख रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला.

या प्रकरणात ईडीने यापूर्वी न्यायालयाकडे PMLA कलम 50 अंतर्गत लोढा यांची चौकशी करण्याची आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे त्यांचा जबाब नोंदवण्याची परवानगी मागितली होती. विशेष न्यायालयाने ही मागणी मान्य केली होती. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण न करता त्याच उपलब्ध सामग्रीच्या आधारे अटक करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. अशा परिस्थितीत अटकेच्या अधिकाराचा वापर हा ‘colourable exercise of power’ ठरतो, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार दुष्काळाच्या संकटात; मासेमारी नौकांची संख्या अन्…

विनोद पाटील यांची चौकशी का झाली होती?

या प्रकरणाच्या तपासादरम्यान कल्याण ग्रामीणमधील मनसे नेते विनोद पाटील यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. लोढा ग्रुप आणि पाटील कुटुंबीयांचे गेल्या सुमारे ३० वर्षांपासून व्यावसायिक संबंध आहे. याच व्यावसायिक संबंधातून झालेल्या आर्थिक व्यवहारांबाबत विनोद पाटील यांची ईडी करून विचारपूस करण्यात आली होती.

राजेंद्र लोढा यांच्या अटकेनंतर विनोद पाटील यांची ईडीकडून चौकशी झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा आणि तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, आता राजेंद्र लोढा यांच्या अटकेच्या कारवाईवरच उच्च न्यायालयाने गंभीर निरीक्षणे नोंदवल्याने या संपूर्ण तपासाची दिशा, चौकशीची पद्धत आणि त्यामागील कारवाई याबाबत नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. मनसे नेते विनोद पाटील यांची देखील चौकशी झाली होती आता या चौकशी संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करीत चर्चा सुरू झाली आहे.

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Web Title: Bombay high court quashes rajendra lodha ed arrest vinod patil questioning under focus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • ED
  • Kalyan-Dombivli

संबंधित बातम्या

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट
1

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.