Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News: महापालिका मुख्यालयातच स्वच्छतेचा बोजवारा! कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मृत कुत्र्याचे पिल्लू; KDMC अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

KDMC News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, आता चक्क महापालिकेच्या मुख्यालय परिसरातच अस्वच्छतेचे चित्र समोर आले आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मृत कुत्र्याचे पिल्लू पडून असल्याचे निदर्शनास आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2026 | 02:31 PM
महापालिका मुख्यालयातच स्वच्छतेचा बोजवारा! कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मृत कुत्र्याचे पिल्लू; KDMC अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

महापालिका मुख्यालयातच स्वच्छतेचा बोजवारा! कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मृत कुत्र्याचे पिल्लू; KDMC अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:
  • शहर स्वच्छ ठेवणाऱ्या महापालिकेचे मुख्यालयच अस्वच्छ
  • मृत पिल्लू पडून, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
  • स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल
KDMC News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आता चक्क महापालिकेच्या मुख्यालयातच अस्वच्छतेचे चित्र समोर आले आहे. मुख्यालय परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मृत कुत्र्याचे पिल्लू पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, बराच वेळ उलटूनही संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या स्वच्छतेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.(KDMC News)

महापालिका मुख्यालयातच कचऱ्याचे ढीग

कल्याण-डोंबिवली शहरातील विविध भागांमध्ये अस्वच्छता आणि कचऱ्याच्या समस्येबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. रस्त्यांवरील कचरा, साचलेला घाण आणि स्वच्छतेच्या अपुऱ्या उपाययोजनांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. मात्र, आता या अस्वच्छतेचे चित्र थेट महापालिकेच्या मुख्यालय परिसरातच पाहायला मिळत आहे. मुख्यालयातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मृत कुत्र्याचे पिल्लू पडून असल्याचे समोर आले आहे. या घटनेकडे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष गेले नसल्याचे दिसून येत आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या खुर्चीवरून महायुतीत सत्तासंघर्षाची चाहूल! अध्यक्षपदाचा तिढा कोण सोडवणार?

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संताप

शहरातील स्वच्छता राखणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही महापालिका प्रशासनाची प्रमुख जबाबदारी आहे. मात्र, ज्या महापालिका प्रशासनावर संपूर्ण शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे, त्याच प्रशासनाच्या मुख्यालय परिसरात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरातील अस्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून त्यांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. मुख्यालय परिसरातील मृत पिल्लू आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

आता तरी KDMC प्रशासन जागे होणार का?

महापालिकेच्या मुख्यालयातच स्वच्छतेची अशी अवस्था असेल, तर शहरातील इतर भागांमध्ये स्वच्छतेची परिस्थिती कशी असेल, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मुख्यालय परिसरातील अस्वच्छतेकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल कशी घेतली जाणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने मृत कुत्र्याच्या पिल्लाची योग्य विल्हेवाट लावावी आणि परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे. आता तरी KDMC प्रशासन या प्रकाराची दखल घेऊन आवश्यक कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Vasai Crime News : वसई पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक; बांगलादेशी चोरांकडून लाखोंच्या दागिन्यांसह विदेशी डॉलर्स जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात कोणती घटना समोर आली आहे?

    Ans: महापालिका मुख्यालय परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मृत कुत्र्याचे पिल्लू पडून असल्याचे निदर्शनास आले आहे.

  • Que: या घटनेमुळे नागरिकांनी कोणता सवाल उपस्थित केला आहे?

    Ans: शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या मुख्यालयातच अस्वच्छता असेल, तर संपूर्ण शहराच्या स्वच्छतेची अवस्था काय असेल, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

  • Que: नागरिकांची महापालिका प्रशासनाकडे काय मागणी आहे?

    Ans: मृत कुत्र्याच्या पिल्लाची तातडीने विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करावा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित यंत्रणेने जबाबदारीने काम करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Kdmc headquarters cleanliness issue dead puppy garbage dump kalyan dombivli sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Dombivli
  • Kalyan-Dombivli
  • KDMC

संबंधित बातम्या

Kalyan Politics: 11 महिने उलटले, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा पत्ता नाही! कल्याण-डोंबिवली महापालिकेबाहेर ठाकरे गटाचा ठिय्या
1

Kalyan Politics: 11 महिने उलटले, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा पत्ता नाही! कल्याण-डोंबिवली महापालिकेबाहेर ठाकरे गटाचा ठिय्या

Kalyan Burial Dispute: मृतदेह घरात, पण दफनसाठी जागाच नाही! कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना
2

Kalyan Burial Dispute: मृतदेह घरात, पण दफनसाठी जागाच नाही! कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना

बिल्डरच्या सांगण्यावरून नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटिसा? KDMC सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्यावर कारवाईची मागणी
3

बिल्डरच्या सांगण्यावरून नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटिसा? KDMC सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्यावर कारवाईची मागणी

Ulhasnagar Metro Project: मेट्रोचे श्रेय भाजपचे की शिवसेनेचे? शहाड ब्रिजवरूनही राजकीय संघर्ष; कुमार आयलानी विरुद्ध कमलेश निकम
4

Ulhasnagar Metro Project: मेट्रोचे श्रेय भाजपचे की शिवसेनेचे? शहाड ब्रिजवरूनही राजकीय संघर्ष; कुमार आयलानी विरुद्ध कमलेश निकम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.