Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Dombivli Election: कल्याण-डोंबिवली मनपा आरक्षण सोडतीचा मुहूर्त ठरला; ११ नोव्हेंबरला अत्रे नाट्यगृहात होणार सोडत

कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीची मोठी बातमी! प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला आचार्य अत्रे नाट्यमंदिरात होणार. SC, ST, OBC आणि महिला जागांचे आरक्षण पॅनल पद्धतीने निश्चित होणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 07, 2025 | 06:35 PM
कल्याण-डोंबिवली मनपा आरक्षण सोडतीचा मुहूर्त ठरला (Photo Credit - X)

कल्याण-डोंबिवली मनपा आरक्षण सोडतीचा मुहूर्त ठरला (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • KDMC निवडणूक आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला
  • पॅनल पद्धतीमुळे इच्छुकांचे लक्ष
  • महिलांसाठीच्या जागांचे आरक्षण होणार निश्चित
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेनंतर आता प्रभाग आरक्षण सोडतीचे वेध लागले आहेत. येत्या आठवड्यातील मंगळवारी ११ नोव्हेंबरला पालिकेच्या आचार्य अत्रे नाट्य मंदिरात प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग आणि महिलांसाठीच्या जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. आरक्षित प्रभागातून निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे या प्रभाग आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे.

प्रथमच चार सदस्यीय पॅनल पद्धत

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने केडीएमसी आगामी पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेची आगामी पालिका निवडणूक प्रथमच चार सदस्यीय पॅनल पद्धतीने घेतली जाणार आहे. १२२ सदस्य निवडीसाठी १२२ प्रभागांतून चार सदस्यांचे २९ पॅनल तर तीन सदस्यांचे दोन पॅनल अशा ३१ पॅनलची निवडणूक घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रभाग रचना जाहीर करून तिला शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातात वाढ

महिलांसाठीच्या जागांचे आरक्षण होणार निश्चित

त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांचे सोडत पद्धतीने आरक्षण काढण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्याने त्यानुसार कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी ११ नोव्हेंबरला कल्याणातील आचार्य अत्रे नाट्य मंदिरात ही सोडत काढली जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), मागासवर्गीय प्रवर्ग (OBC) आणि महिलांसाठीच्या जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

सोडतीनंतरचे वेळापत्रक:

  • १७ नोव्हेंबरला प्रसिद्धी,
  • २४ नोव्हेंबरला हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख,
  • २५ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर या कालावधीत हरकतींचा विचार व अंतिम आरक्षणाचा निर्णय,
  • तर २ डिसेंबरला अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.
केडीएमसीची सार्वत्रिक पालिका निवडणूक प्रथमच पॅनल पद्धतीने होणार असल्याने सर्वच वर्गांची आरक्षणे नव्याने सोडत पद्धतीने काढली जाणार आहेत. त्यामुळे कोणता प्रभाग महिलांसाठी राखीव असणार, कोणता प्रभाग ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गासाठी आरक्षित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Bhiwandi News : वीजदर वाढीला न्यायालयाची स्थगिती; वीज नियामक आयोगाला दणका

Web Title: Kalyan dombivli municipal corporation will be releasing the reservation on november 11th at atre theatre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 05:17 PM

Topics:  

  • Election
  • kalyan dombivali news

संबंधित बातम्या

Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान
1

Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

मनपा निवडणूकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज; ‘या’ १० केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर! वेबकास्टिंग आणि सीसीटीव्हीचा पहारा
2

मनपा निवडणूकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज; ‘या’ १० केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर! वेबकास्टिंग आणि सीसीटीव्हीचा पहारा

Karjat News: कर्जतमध्ये सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक, नितीन सावंतांना सोबत घेत थोरवे आणि लाड यांना धक्का
3

Karjat News: कर्जतमध्ये सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक, नितीन सावंतांना सोबत घेत थोरवे आणि लाड यांना धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.