Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan-Dombivali: कल्याण-डोंबिवलीत पोलिसांची ‘ऑल आऊट’ मोहीम; एकाच रात्री ३५० हून अधिक गुंड, मद्यपी ताब्यात!

कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री मोठी छापा मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत एकूण २४० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 26, 2025 | 08:06 PM
कल्याण-डोंबिवलीत पोलिसांची 'ऑल आऊट' मोहीम

कल्याण-डोंबिवलीत पोलिसांची 'ऑल आऊट' मोहीम

Follow Us
Close
Follow Us:
  • कल्याण-डोंबिवली २४० पोलिसांची धडक कारवाई
  • सार्वजनिक ठिकाणचे गैरधंद्याचे अड्डे उद्ध्वस्त
  • महत्त्वाचे गुन्हे आणि दंड

Kalyan-Dombivali: कल्याण-डोंबिवली परिसरात मागील काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या, तसेच रात्रीच्या वेळेत सार्वजनिक ठिकाणांवर मद्य आणि अंमली पदार्थांचे सेवन, तसेच छुप्या गैरधंद्यांचे अड्डे वाढीस लागल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री मोठी छापा मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत एकूण २४० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. रात्री आठ ते पहाटे चार या वेळेत कल्याण आणि डोंबिवली शहरातील विविध भागांत एकाच वेळी धरपकड मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ३५० हून अधिक समाजकंटक, गुंड, मद्यपी आणि गैरधंदे करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

‘कल्याण-डोंबिवली नशामुक्त शहर’ या उद्दिष्टाचा भाग

गेल्या वर्षीही अशाच प्रकारची मोहीम सलग दोन ते तीन महिने राबवून पोलीस दलाने शहरातील अनेक गैरधंदे, अड्डे उद्ध्वस्त केले होते. सार्वजनिक ठिकाणी मद्य व अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. ही मोहीम ‘कल्याण-डोंबिवली नशामुक्त शहर’ या उद्दिष्टाचा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. अलीकडे पुन्हा काही अड्डे आणि अवैध व्यवहार सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त झेंडे यांनी आठही पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचानक आदेश देऊन शनिवारी रात्री धडक छापा टाकण्याचे निर्देश दिले. या कारवाईत उपायुक्त झेंडे आणि साहाय्यक पोलीस आयुक्त स्वतः सहभागी झाले.

Dombivali: मनसेच्या इशाऱ्यानंतर डोंबिवली स्टेशन परिसरात पालिका प्रशासनाची धडक कारवाई; जेसीबीनं अनधिकृत शेड्स जमीनदोस्त

पोलिसांनी वेढा घालून घेतले ताब्यात

कल्याण रेल्वे स्थानक परिसर, वाहनतळ, आणि झाडाझुडपांमध्ये लपून मद्य व अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना पोलिसांनी वेढा घालून ताब्यात घेतले. काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालून त्यांना पकडले. अनेक ठिकाणी पकडलेल्या व्यक्तींना परिसरातून पोलिसांनी वरात काढत पोलिस ठाण्यात आणले.

महत्त्वाचे गुन्हे आणि दंड

या कारवाईत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांकडून तब्बल ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सहा खतरनाक गुंडांना अटक करण्यात आली, तर २७ तडीपार गुंडांची चौकशी करण्यात आली. या मोहिमेत पकडलेल्या मद्यपींमध्ये काही सुस्थितीत घरातील तरुणांचाही समावेश असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयीन कारवाई सुरू आहे. रात्री आठपासून पहाटे चारपर्यंत कारवाई सुरू होती.

KDMC : MIDC निवासीमध्ये कचरा संकलनसाठी घंटागाडीचा घोळ; स्थानिकांचे नाहक हाल

Web Title: Police conduct all out campaign in kalyan dombivli more than 350 goons drunkards arrested in a single night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 08:03 PM

Topics:  

  • kalyan dombivali news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.