Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केडीएमसीच्या 27 गावांना मालमत्ता करात 9 वर्षांकरीता सूट; वाचा…केव्हा लागू होणार महापालिका कर

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमधील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केडीएमसीच्या २७ गावांना मालमत्ता करात ९ वर्षाकरीता सूट दिली जाणार आहे. तर, मार्च २०२४ नंतर या गावांना महापालिका कर लागू होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 20, 2024 | 05:47 PM
केडीएमसीच्या 27 गावांना मालमत्ता करात 9 वर्षांकरीता सूट; वाचा...केव्हा लागू होणार महापालिका कर

केडीएमसीच्या 27 गावांना मालमत्ता करात 9 वर्षांकरीता सूट; वाचा...केव्हा लागू होणार महापालिका कर

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमधील मालमत्ताधारकांना २०१५ ते २०२४ दरम्यान ग्रामपंचायतीच्या दराप्रमाणेच कर वसूल केला जाणार आहे. तर, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षाकरिता महापालिकेच्या चालू दराप्रमाणे कराची आकारणी करण्यात येणार आहे. ही चालू दराप्रमाणे असलेली कराची आकारणी, मार्च २०२५ अखेरपर्यंत भरावी लागणार आहे. त्यासाठी नव्याने सुधारीत मालमत्ता कराची बिले पाठविण्याची कार्यवाही महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून सुरु करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून २७ गावांचा प्रश्न खितपत

२७ गावे महापालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेत हाेती. १९८३ पासून ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाली होती. त्यांना नागरी सोयी सुविधा पुरविल्या जात नसल्याने गावे महापालिकेतून वेगळी करण्याची मागणी जोर धरल्याने २००२ साली तत्कालीन आघाडी सरकारने गावे महापालिकेतून वगळली. पुन्हा जून २०१५ साली गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. ही गावे जिल्हा परिषदेच्या हद्दीत असताना त्यांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता कराप्रमाणे कर आकारणी केली जात होती.

हेही वाचा – “… पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?”; बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा संतप्त सवाल

समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर

दरम्यान, महापालिकेत समाविष्ट झाल्याने मालमत्ता कराची आकारणी महापालिका दरानुसार सुरु झाली. २७ गावांना १० पट मालमत्ता कर आकारणी केली जात असल्याने, कर भरण्यास नागरीकांचा विरोध होता. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक घेऊन दहा पट कर वसूलीचा फेर विचार करण्याकरीता एक समिती नेमली. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने राज्य सरकारकडे फेब्रुवारी २०२४ मध्ये एक अहवाल सादर केला होता.

मार्च २०२४ नंतर लागू होणार महापालिका कर

या अहवालापश्चात मुख्यमंत्र्यांच्या अध्यतेखाली एक बैठक झाली होती. त्यानंतर २७ गावातील मालमत्ताधारकांना राज्य सरकारने दिला आहे. हा दिलासा केवळ २०१५ ते मार्च २०२४ पर्यंतचा आहे. केवळ ९ वर्षाच्या कालावधीतील मालमत्ता कर हा ग्रामपंचायतीच्या दराप्रमाणे वसूल केला जावा. मार्च २०२४ नंतर मालमत्ता कराची वसूली महापालिकेच्या चालू कर दराप्रमाणे केली जावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Property tax exemption for 27 villages of kdmc for 9 years municipal tax will be applicable from march 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 05:47 PM

Topics:  

  • Property Tax

संबंधित बातम्या

उत्पन्न वाढीसाठी पुणे महापालिका ‘अ‍ॅक्शन मोड’वर; मिळकत कर विभागाच्या निरीक्षकांना आता ‘टार्गेट’ मिळणार
1

उत्पन्न वाढीसाठी पुणे महापालिका ‘अ‍ॅक्शन मोड’वर; मिळकत कर विभागाच्या निरीक्षकांना आता ‘टार्गेट’ मिळणार

Kolhapur News : होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय
2

Kolhapur News : होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय

Kolhapur News : जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास 100 टक्के घरफाळा माफ; ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला महत्त्वाचा निर्णय
3

Kolhapur News : जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास 100 टक्के घरफाळा माफ; ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.