

ठाण्यातील रिक्षा संघटनांनी १ डिसेंबरपासून संप मागे घेण्याचे संकेत
बैठकीत रिक्षाचालकांच्या बहुतांश मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
सीएनजी रिक्षांच्या हायड्रो टेस्टिंगमधील कथित मनमानीबाबत चर्चा करण्यात आली.
ठाण्यातील विविध रिक्षा संघटनांच्या कृती समितीने १ डिसेंबरपासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे महत्त्वपूर्ण बैठक घेऊन रिक्षाचालकांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. या यशस्वी शिष्टाईमुळे प्रस्तावित आंदोलन मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रिक्षाचालक आणि प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रिक्षाचालकांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रिक्षाचालकांच्या मागण्या केवळ ऐकून न घेता त्यावर ठोस उपाययोजना करण्याची भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्रमाला घेतली, रिक्षाचालकांच्या श्रमाला योग्य व्यवसायातील अडचणी दूर झाल्या पाहिजेत तसेच त्यांना सन्मानाने उदरनिर्वाह करता आला पाहिजे, यासाठी शासन निश्चितच सकारात्मक असल्याची ग्वाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली. तसेच, बेकायदेशीर सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांमुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा मुद्दा संघटनांनी उपस्थित केला. त्याची गंभीर दखल घेत अशा बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
सीएनजी रिक्षांच्या हायड्रो टेस्टिंगच्या नावाखाली होणारी कथित मनमानी आणि रिक्षाचालकांची आर्थिक पिळवणूक याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रिक्षा भाडेवाढीबाबत रिक्षा संघटनांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची दखल घेत सध्याच्या दरवाढीचा फेरविचार करून खटुआ समितीच्या निकषांनुसार नवीन दर निश्चित करण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. तसेच भविष्यात रिक्षा भाडेवाढ निश्चित करणाऱ्या समितीमध्ये रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींचाही समावेश असावा, अशी शिफारस करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना आपल्या प्रश्नांची मांडणी करण्यासाठी अधिकृत व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. एकूणच, १ डिसेंबरपासून होणाऱ्या संभाव्य रिक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे रिक्षाचालकांच्या प्रश्नांना सकारात्मक दिशा मिळाली आहे. त्यामुळे प्रस्तावित संप मागे घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून, ठाणेकरांसह सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर शासन संवेदनशील असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ दिले जाणार नाही. मात्र, कोणत्याही आंदोलनामुळे सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होऊ नये, हीदेखील शासनाची भूमिका आहे. रिक्षाचालकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)