Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar Elections: मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील मतदार याद्यांचा घोळ; अंतिम यादीतही प्रचंड गोंधळ, बोगस मतदानाची भीती

Mira Bhayandar Elections News Marathi : आगामी महापालिका निवडणुकीसाठी 198 ठिकाणी 976 मतदान केंद्रे उभारण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार केंद्रात आवश्यक गोष्टीच्या उभारणीकडे प्रशासनाकडून काम केले जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 17, 2025 | 11:29 AM
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील मतदार याद्यांचा घोळ कायम; अंतिम यादीतही प्रचंड गोंधळ, बोगस मतदानाची भीती

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील मतदार याद्यांचा घोळ कायम; अंतिम यादीतही प्रचंड गोंधळ, बोगस मतदानाची भीती

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीतील मतदार याद्यांचा घोळ कायम
  • अंतिम यादीतही प्रचंड गोंधळ
  • बोगस मतदानाची भीती
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांचा वापर करण्यात येत असून, या याद्यांमध्ये आधीपासूनच मोठ्या प्रमाणात घोटाळे आहेत, अशी तक्रारी असताना देखील त्याच सदोष याद्या महापालिका निवडणुकीसाठी वापरल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रारूप मतदार यादीत झालेला प्रचंड घोळ अंतिम यादीतही दुरुस्त करण्यात न आल्याने परिस्थिती ‘आगीतून फुफाट्यात’ गेल्यासारखी झाल्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या कर विभागाने विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांची २४ प्रभागनिहाय विभागणी केली. मात्र प्रारूप यादीत एका-एका प्रभागातील हजारो मतदारांची नावे आजूबाजूच्या तसेच तब्बल ८ ते १० किमी अंतरावरील इतर प्रभागांत टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या अफरातफरीविरोधात तब्बल ७४० हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. असे असतानाही अंतिम यादीत या त्रुटी कायम असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छूक उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही लोकशाहीची गळचेपी…! आयोगाच्या निवडणूक जाहीर करण्याच्या टायमिंगवर विरोधकांना संशय

१० किमी दूर प्रभागात मतदारांची नावे

अंतिम मतदार यादीत पाली-डोंगरी-तारोडी परिसरातील (प्रभाग २४) सुमारे १६०० मतदारांची नावे थेट भाईंदर पूर्वेतील जेसलपार्क परिसरातील प्रभाग २ मध्ये टाकण्यात आली आहेत. जेसलपार्कसह आसपासच्या निवासी संकुलांची नावे प्रभाग ३ व ४ मध्ये, तर प्रभाग ३ मधील मतदारांची नावे पुन्हा प्रभाग २ मध्ये टाकल्याचे दिसून येते. तसेच इंद्रलोक-पूजापार्क (प्रभाग १२), काशिमिरा (प्रभाग १४) आणि हटकेश (प्रभाग १३) येथील मतदारांची नावे मीरारोडच्या प्रभाग १८ मध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी जवळपास सर्वच प्रभागांमधून येत आहेत.

दुबार व अस्तित्वात नसलेल्या मतदारांची संख्या धक्कादायक

महापालिकेने स्वतःच दुबार मतदारांची संख्या ४४,८६२ इतकी असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात वास्तव्यास नसलेले मतदारही हजारोंच्या संख्येने असल्याने दुबार आणि अस्तित्वात नसलेल्या मतदारांची एकूण संख्या लाखाच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदानाचा गंभीर धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त होत आहे.

सदोष यादीच अंतिम म्हणून जाहीर

इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी, हरकती आणि त्रुटी समोर येऊनही महापालिका प्रशासन व निवडणूक आयोगाने मतदार याद्या काटेकोरपणे दुरुस्त न करता त्या थेट अंतिम यादी म्हणून प्रसिद्ध केल्या. या याद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर जरी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्ष रीतसर प्रती घेण्यासाठी इच्छूकांची मोठी गर्दी होत आहे. याद्यांची पडताळणी करताच सर्वच पक्षीय इच्छूक उमेदवारांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे, कारण संपूर्ण परिसरच दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचे वास्तव समोर येत आहे.

महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीला

अंतिम मतदार यादीतील घोळानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या नीलम ढवण, ज्योती शेवंते, तसेच मनसेचे हेमंत सावंत, सचिन पोपळे आदींच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची भेट घेतली. यावेळी प्रारूप तसेच अंतिम मतदार यादीतील घोळ हा भाजपाच्या दबावाखाली पालिका प्रशासनाने केल्याचा गंभीर आरोप शिष्टमंडळाने केला. कर विभागातील कर्मचारी परिसराची संपूर्ण माहिती असताना देखील इतक्या मोठ्या चुका कशा झाल्या, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

यावर आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी, “अंतिम मतदार यादीत आता कोणतेही बदल करण्याचे अधिकार नाहीत. मात्र तक्रारी स्वीकारल्या जातील; त्यावर विचार केला जाणार नाही,” असे स्पष्ट केले. तसेच कर विभागाच्या उपायुक्तांना बोलावून सदोष यादी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मनसे नेते सचिन पोपळे यांनी दिली.

लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

मतदार याद्यांमधील या गोंधळामुळे मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन व आयोगाने तातडीने यावर ठोस उपाययोजना न केल्यास निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पुण्यात महायुती नाहीच? फडणवीसांची घोषणा; मात्र अजित पवारांच्या उत्तराने वाढवली उत्सुकता

Web Title: The confusion over the voter lists in the mira bhayandar municipal elections continues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • elections
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ही लोकशाहीची गळचेपी…! आयोगाच्या निवडणूक जाहीर करण्याच्या टायमिंगवर विरोधकांना संशय
1

Maharashtra Politics: ही लोकशाहीची गळचेपी…! आयोगाच्या निवडणूक जाहीर करण्याच्या टायमिंगवर विरोधकांना संशय

पुण्यात महायुती नाहीच? फडणवीसांची घोषणा; मात्र अजित पवारांच्या उत्तराने वाढवली उत्सुकता
2

पुण्यात महायुती नाहीच? फडणवीसांची घोषणा; मात्र अजित पवारांच्या उत्तराने वाढवली उत्सुकता

Nepal Elections वर जगाचे लक्ष! ‘कार्टर सेंटर’सह 4 आंतरराष्ट्रीय संस्था करणार देखरेख; 5 मार्चला लोकशाहीचा मोठा उत्सव
3

Nepal Elections वर जगाचे लक्ष! ‘कार्टर सेंटर’सह 4 आंतरराष्ट्रीय संस्था करणार देखरेख; 5 मार्चला लोकशाहीचा मोठा उत्सव

Maharashtra Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये तिरंगी लढत; भाजप-राष्ट्रवादी अन्…; कोण जिंकणार?
4

Maharashtra Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये तिरंगी लढत; भाजप-राष्ट्रवादी अन्…; कोण जिंकणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.