पुण्यामध्ये महायुतीमध्ये मैत्रिपूर्ण लढतीवर पालकमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
राज्य निवडणूक आयोग निवडणूक जाहीर केली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर होते. निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, “काही ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी अशी युती होईल. पुण्यात मात्र माझी आणि अजित पवार यांची चर्चा झाली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने 5 वर्षात चांगल्या पद्धतीने पुण्याचा विकास केलेला आहे. कदाचित पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप आमने-सामने लढताना दिसतील. ही लढत मैत्रीपूर्ण असणार आहे. कुठेही कटुता नसेल.”अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. यामुळे पुण्यामध्ये महायुतीचा काडीमोड झाला असल्याचे दिसून आले.
हे देखील वाचा : नागपूरची थंडी नेत्यांना होईना सहन! हिवाळी अधिवेशनामध्ये दोन मंत्री,10 आमदार अन् 1355 कर्मचारी पडले आजारी
फडणवीस पुढे म्हणाले की, शिवसेना शक्यतो सर्वच ठिकाणी आमच्यासोबत असेल. मात्र पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही आणि अजित पवार एकत्र लढू शकणार नाही. आम्हालाही एवढं राजकारण समजतं. आम्ही दोघं एकत्र लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल. त्यामुळे आम्ही तिसऱ्यासाठी जागा बाकी ठेवणार नाही. आम्हीच एकमेकांसमोर लढू आणि ही मैत्रिपूर्ण लढत असेल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.
हे देखील वाचा : उमेदवारांनो लक्ष द्या ! उमेदवारी अर्जाबाबत महत्त्वाची माहिती आली समोर; आता अर्ज भरताना…
पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुती एकत्र नसल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. याबाबत पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील प्रश्न विचारण्यात आला. याबाबत अजित पवार म्हणाले की, आमची रणनीती ही निवडणूका लढवण्याचीच असणार आहे. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. पण तुम्हाला काय सांगितलं जातं हे मला माहिती नाही. पण त्यांनी सांगितलं तर विचार करुन सांगितलं असेल अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.






