
Raigad News: पेणमध्ये सत्तासमीकरण ढवळणार! भाजपाला कडवी झुंज, दोन्ही शिवसेना-शेकाप मैदानात
Malvan News: मच्छीमार आंदोलन: ९३ आरोपीची मुक्तता; 10 वर्षांपासून सुरू होता खटला
जिल्हा परिषदेच्या पाच गटात दाखल झालेल्या २८ उमेदवारी अर्जातून १४ उमेदवारी अर्ज मागे घेतले असून उर्वरित १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर २८ उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले आहेत. भाजपसाठी वडखळ आणि शिहू या दोन जिल्हा परिषद गटात शेकाप आणि दोनही शिवसेना पक्षाचे उमेदवारांचे कडवे आव्हान असणार आहे. तर उर्वरित तीन गट भाजपच्या दोन नेते धैर्यशील पाटील आणि आमदार रवींद्र पाटील यांचे होमपीच असल्याने या ठिकाणी भाजपाला तितकेसे आव्हान नसणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
राज्याचे मुख्यमंत्री भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे जिल्हा परिषदेच्या दहा उमेदवारांसाठी प्रचार सभा पेण नगरपालिका मैदानावर घेणार असून या सभेसाठी पेण पालिका मैदानावर जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरले असून निवडणूक प्रचारात विरोधकांकडून पेण तालुक्यातील पाणी टंचाईचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात काय बोलतात ? याकडे नागरिकांसह राजकीय समिक्षकांचे लक्ष लागले आहे. शहर व ग्रामीण भागात येत्या फेब्रुवारीपासून पाणी टंचाईचे चटके नागरिकांना सोसावे लागणार आहेत.
वडखळ जिल्हा परिषद गटात वडखळ गावात खासदार धैर्यशील पाटील व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील भाजपा उमेदवार प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती उमेदवार विवेक म्हात्रे व प्रदीप म्हात्रे या तिघांसाठी जोरदार फटकेबाजी करीत झालेल्या कॉर्नर सभेत भाजपा पक्षासोबत राहणारे व नंतर सोडून जाणा-यांनी या अगोदर भाजपा पक्षाच्या योजना जनतेपर्यंत नेऊन त्या आम्हीच आणल्या असे भासवून जनतेत गैरसमज निर्माण करीत असून स्वतःच्याच फायद्यासाठी या निवडणुकीत वापर करणा-यांना योग्य जागा दाखवून देण्याची हीच वेळ आहे, असे सांगण्यात येत आहे.
“मुंब्रा हिरवे करण्याचा उद्देश राजकीयच…”, किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर Sahar Sheikh यांचा माफीनामा
भाजपा सोडणाऱ्यांना यापुढे भाजपा पक्षाची दारे कायम बंद असणार आहेत, हा निर्वाणीचा सूचक इशारा नाव न घेता त्यांनी वडखळ गटात भाजपाशी काडीमोड घेतलेल्या विरोधी उमेदवारांकडे त्यांचा अंगुली निर्देश होता, भाजपाचे नेते एकामागून एक असे पेणमध्ये येत असून दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय सरचिटणीस आ. प्रविण दरेकर व भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी साई सहारा हॉटेलमध्ये दक्षिण रायगड उमेदवारांची पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधित केले होते. प्रसारमाध्यमांना या सभेपासून दूर ठेवण्यात आले होते. यानंतर मुख्यमंत्री येत असल्याने एकंदरीत राजकीय वातावरण चांगलेच गरमागरम झालेले दिसून येत आहे.
जिते २. दादर २. वडखळ ५. शिहू २. महल मिरा ३ एकुण १४ उमेदवार
जिते ५. वाकुळ ३. दादर ३, रावे २, वडखळ ४ वाशी ५. शिहू-२, डोलवी- २. महलमिरा- २ -वडगाव- २. एकुण ३० उमेदवार