Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभेपूर्वी राजकीय वारे फिरले; अजित पवार गटाचा बडा मासा शरद पवारांच्या गळाला

समविचारी पक्षासोबत काम करणे सोपे जाते. पण भिन्न भिन्न विचारांच्या पक्षासोबत  काम करणे अवघड जाते.  कार्यकर्त्यानांही अवघड जाते,  मतदारही संभ्रमात पडतात. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारानेच काम करत आहेत. पण त्या ठिकाणी जे पक्ष आहेत. त्याच्यामुळे सगळेच आमच्यासारखे अल्पसंख्यांक विचाराच्या कार्यकर्त्याची विटंबना होत आहे, असेही दुरानी यांनी सांगितले.  

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 27, 2024 | 09:52 AM
विधानसभेपूर्वी राजकीय वारे फिरले; अजित पवार गटाचा बडा मासा शरद पवारांच्या गळाला
Follow Us
Close
Follow Us:

परभणी:  विधानसभा निवडणुकीच्या राज्यातील राजकीय वारे उलट्या दिशेने वाहू लागल्याचे चित्र दिसत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसात अनेक बड्या नेत्यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडली.  त्यांनतर आता अजित पवार यांच्या गटाचे आमदार बाबाजानी दुरानी हेदेखील लवकरच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे तसे संकेत खुद्द बाबाजानी दुरानी यांनीच दिलेत .शुक्रवारी (26 जुलै) परभणीत  बाबाजानी दुरानी यांनी  शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथेही आमदार जयंत पाटील यांचीही भेट घेतली.

यावेळी माध्यमांशी बोलताना दुरानी म्हणाले, “मी मनाने शरद पवार साहेबांसोबतच आहे. मी 1985 पासून शरद पवार साहेबांसोबत आहे. यापूर्वी सुद्धा मी एका विचाराने काम केलेलं आहेशरद पवार यांना भेटण्याचे मुख्य कारण म्हणजे भविष्यात मला पवार साहेबांसोबत काम करण्याची इच्छा आहे.  त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा अर्थ प्रवेश झाल्यासारखाच होतो.”

“समविचारी पक्षासोबत काम करणे सोपे जाते. पण भिन्न भिन्न विचारांच्या पक्षासोबत  काम करणे अवघड जाते.  कार्यकर्त्यानांही अवघड जाते,  मतदारही संभ्रमात पडतात. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारानेच काम करत आहेत. पण त्या ठिकाणी जे पक्ष आहेत. त्याच्यामुळे सगळेच आमच्यासारखे अल्पसंख्यांक विचाराच्या कार्यकर्त्याची विटंबना होत आहे, असेही दुरानी यांनी सांगितले.

 महायुतीत एका बाजूला भाजप तर दुसऱ्या बाजूला शिंदे गट असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे अवघड आहे. मी मनाने शरद पवारांसोबतच आहे. त्यामुळे  आता फक्त प्रवेशाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. पवार साहेब आणि आम्ही भविष्यात एका विचाराने काम करू.  त्यामुळे तुम्हाला लवकरच मोठी बातमी ऐकायला मिळेल, असे सुचक विधानही त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बाबाजानी दुरानी हे अजित पवारांसोबत गेले आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले. विशेष म्हणजे  त्यांची नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ संपला आहे.  विधान परिषद निवडणुकीत त्यांनी अजित पवारांकडे पुन्हा तिकीट मागितले होतं.  पण त्यांना पुन्हा संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: The big leader of ajit pawars group will go to sharad pawars group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 09:17 AM

Topics:  

  • Vidhansabha Election
  • Vidhansabha Election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.