फोटो सौजन्य -iStock
पुणेकरांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पुण्यातील झिका व्हायरसच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पुण्यात झिका व्हायरसचे 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन गर्भवती महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. यामुळे आता पुण्यातील झिका व्हायरसची रुग्णसंख्या 15 वर गेली आहे. पुण्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. झिकाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच पुण्यात झिका व्हायरसचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. यामध्ये कर्वेनगर परिसरात राहणारी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्स डिपार्टमेंट मध्ये काम करणारी ४२ वर्षीय महिला आणि खराडी येथील एक २२ वर्षीय तरूण यांचा समावेश होता. त्यानंतर आज पुन्हा 3 रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये दोन गर्भवती महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. या दोन्ही गर्भवती महिला पाषाणनधील रहिवासी आहेत. तर 15 वर्षीय मुलगा भुसारी कॉलनीतील रहिवासी आहे. पुण्यात अगदी वेगाने झिका व्हायरसचा प्रसार होत आहे. त्यामुळे पुणेकर आणि आरोग्या विभागाची चिंता वाढली आहे. झिकाचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यात आरोग्य सर्वेक्षण सुरु झालं आहे. झिका व्हायरचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं गर्भवती महिलांच्या तपासणीवर सर्वाधिक भर दिला आहे.
झिका व्हायरसची लक्षणे
कशी काळजी घ्याल
सर्व पाण्याच्या टाक्या आणि कंटेनरवर घट्ट झाकण ठेवा
मच्छरदाणीखाली झोपा
तुमच्या त्वचेवर सुरक्षित कीटकनाशकांचा वापर करा
डास चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लांब आणि सैल कपडे घाला
झिका विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशात प्रवास करणे टाळा
डासांची उत्पत्ती होण्यासाठी पावसाचे पाणी साचू देऊ नका