Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport News: शेतकरी उपोषणावर ठाम; पुरंदर विमानतळासाठी झालेली तहसीलदार-शेतकऱ्यांची चर्चा निष्फळ

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, खानवडी आदी सात गावात विमानतळ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 06, 2025 | 09:04 AM
Purandar Airport  News: शेतकरी उपोषणावर ठाम; पुरंदर विमानतळासाठी झालेली तहसीलदार-शेतकऱ्यांची चर्चा निष्फळ
Follow Us
Follow Us:

सासवड: पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्प रद्द करावा यासाठी प्रकल्प बाधित सात गावांतील शेतकऱ्यांनी शुक्रवारी दि. ४ रोजीपासून सासवडमधील प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे यासाठी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी रात्री उशिरा उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत प्रकल्प रद्द केल्याची अधिसूचना निघत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहिल असा इशारा दिला. यामुळे तहसीलदार विक्रम राजपूत यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, खानवडी आदी सात गावात विमानतळ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. यामुळे सातही गावांतील नागरिक कायमचे विस्थापित होणार आहेत. त्या बरोबरच शेती, कुक्कुटपालन व्यवसाय, जनावरांचे गोठे, शेततळी, विहीर, बोअर, सर्व घरे, जनावरे सर्व  सोडून जावे लागणार आहे. पिढ्‌यानपिढ्या राहत असलेली घरेदारे सोडून दुसऱ्या गावी राहून परवडणारे नाही, याचे दुख शेतकरी वारंवार बोलून दाखवीत आहेत. मात्र शासन शेतकऱ्यांची कोणतीही बाजू ऐकून न घेता दररोज एक-एक अध्यादेश पारित करीत आहे.

Sedan vs SUV: मायलेज, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार आहे बेस्ट?

सुविधांपासून शेतकऱ्यांना रहावे लागणार ‘वंचित’ गेल्या महिन्यात विमानतळ प्रकल्प क्षेत्रातील गावे औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) म्हणून शासनाने जाहीर केली. तसेच भूसंपादनाचा पुढील टप्पा गाठण्याच्या दृष्टीने गावोगावी अधिकारी शेतकऱ्यांशी संवाद च्या माध्यमातून ड्रोन सर्व्हे करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच पुढील टप्प्यात ३२ ‘ग’ चा आदेश निघाल्यानंतर सर्व क्षेत्रावर शिक्के मारण्याची प्रक्रिया होणार आहे. जमिनीवर शिक्के मारल्यावर शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत. केवळ जिल्हा बँकेकडून मिळणारे पिक कर्ज वगळता इतर सर्व सुविधांपासून कायमचे वंचित राहावे लागणार आहे.

आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा विमानतळ प्रकल्प नकोच अशी घोषणा करून २०१६ पासून सात गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी सासवडमधील प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. तसेच कोणत्याही परिस्थतीत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री तहसीलदार विक्रम राजपूत यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र आमच्या भावना जोपर्यंत शासनापर्यंत पोहोचत नाहीत. तसेच शासन आमची दखल घेणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा दिला. प्रांताधिकारी यांनी भेट घ्यावी, आम्हाला न्याय द्यावा अशी मागणीही केली आहे.

Pune News: “हे रूग्णालय ताब्यात…”; मंगेशकर रूग्णालयातील घटनेवरून आदित्य ठाकरेंचा जोरदार

Web Title: The discussion between the tehsildar and farmers for purandar airport failed nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • Purandar airport project

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.