Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कासारवडवली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा खुला; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण

कासारवडवली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला असून, मंत्री सरनाईक यांनी त्याचे लोकार्पण केले. हा प्रकल्प ठाण्याच्या वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 08, 2025 | 08:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे शहराच्या वाहतुकीचा बोजा हलका करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा कासारवडवली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा अखेर ८ जुलै २०२५ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मंत्री सरनाईक यांनी या प्रकल्पाशी जोडलेली आपली भावना आणि त्यामागचा संघर्ष उलगडला.

Thane News : गांधी हम शर्मिंदा है, आप के कातिल जिंदा है; महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात नागरिकांचं जोरदार आंदोलन

सरनाईक म्हणाले की, “लोकप्रतिनिधी या नात्याने घोडबंदर, गायमुख आणि कासारवडवली परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीमुळे होणारी गैरसोय मी जवळून पाहिली आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे या प्रकल्पाला निधी मंजूर झाला आणि काम वेगात सुरू झाले.”

या उड्डाणपुलामुळे ठाणे – बोरीवली – वसई – जेएनपीटी – गुजरात या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः गायमुख ते वाघबिळ दरम्यानची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूची मार्गिका (सर्विस लेन) नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. उजव्या बाजूचे उर्वरित बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Monsoon Alert: पुढील 5 दिवस कोकणात पावसाचे तांडव तर…; वेधशाळेचा अंदाज काय?

या प्रकल्पामुळे ठाण्याच्या पायाभूत विकासाला गती मिळणार असून, भविष्यात अशा प्रकारच्या अधिक प्रकल्पांची गरज भासणार आहे. “ठाण्याच्या गतिमान विकासासाठी आणि वाहतुकीच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू,” असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या उद्घाटनप्रसंगी स्थानिक नगरसेवक, अधिकारी, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. लोकांनीही या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

Web Title: The first phase of kasarvadavali flyover opened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 08:10 PM

Topics:  

  • Meera Road
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

ST Fare Hike: सरकारवर ओढवली नामुष्की! एका दिवसात निर्णय बदलण्याची वेळ, भाडेवाढ रद्द
1

ST Fare Hike: सरकारवर ओढवली नामुष्की! एका दिवसात निर्णय बदलण्याची वेळ, भाडेवाढ रद्द

राज्य सरकार एसटी बस डेपो 98 वर्षांच्या भाडेतत्वावर देण्यासाठी टेंडर काढणार, परिवहन मंत्री यांची माहिती
2

राज्य सरकार एसटी बस डेपो 98 वर्षांच्या भाडेतत्वावर देण्यासाठी टेंडर काढणार, परिवहन मंत्री यांची माहिती

एसटी महामंडळ कंत्राटी पद्धतीने भरती राबवणार!  ई-निविदा प्रक्रियेसह उमेदवारांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात
3

एसटी महामंडळ कंत्राटी पद्धतीने भरती राबवणार! ई-निविदा प्रक्रियेसह उमेदवारांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात

Learning License काढणाऱ्यांनो लक्ष द्या! ‘ही’ महत्वाची सेवा तात्पुरती स्थगित करण्यासाठी परिवहन विभागाचे NIC ला पत्र
4

Learning License काढणाऱ्यांनो लक्ष द्या! ‘ही’ महत्वाची सेवा तात्पुरती स्थगित करण्यासाठी परिवहन विभागाचे NIC ला पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.