राज्याला जोरदार पावसाचा इशारा (फोटो- ani)
मुंबई: राज्यभरात भारतीय हवामान विभागाने पुढील 5 दिवस अत्यंत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. जून महिन्यात काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढू शकतो.
कोकण किनारपट्टीवर हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 13 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पुस कोसळू शकतो. जुलै महिन्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.
विदर्भ, मराठवाड्यात देखील पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. पुणे धरण साखळीक्षेत्रात देखील सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे पुण्याच्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Heavy to Very heavy rainfall at isolated places very likely to occur at isolated places in the districts of North Konkan and Ghat areas of Madhya Maharashtra. Heavy rainfall very likely to occur at isolated places in the districts of South Konkan-Goa." — Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 7, 2025
मराठवाड्यात वरूणराजा कधी बरसणार?
मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये बराचसा पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जायकवाडी हे मराठवड्यातील महत्वाचे धरण आहे. सध्या या धरणात 55 टक्के पाणीसाठा इतका आहे.
‘या’ 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अनेक भागात हाहाकार माजवला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून नाशिक आणि पालघरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघरमधील सूर्या नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे धामडी धरणाचे सर्व 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही गोदावरी नदी वाहत आहे, ज्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. प्रशासनाने पर्यटन स्थळांवर अलर्ट जारी केला आहे आणि लोकांना नद्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर राज्यात पावसासाठी पुढील पाच दिवस महत्त्ताचे सांगितले आहेत.
राज्यात बऱ्याच ठिकाण जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह अत्यंत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, कोल्हापूर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या भागातही यलो अलर्ट जारी केला आहे.
जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने इशारा दिला आहे की बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यांतय वादळ वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.