Kunal Kamra and Sushma Andhare face rights violation in the maharashtra legislature
आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर पेठ येथे झालेल्या नुकसानीत पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे बोलत होत्या .यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर ,शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष देवदत निकम ,शिवसेनेचे जेष्ठ नेते राजाराम बाणखेले याच्यासह कार्यकर्त उपस्थित होते . शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दोन पिके वाया गेली होती. त्यानंतर आता पुन्हा मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटी व अवकाळी पावसामुळे येथील शेतकऱ्यांची कांदा, ज्वारी, बटाटा व इतर पिके पूर्णपणे नष्ट झाली असून येथील शेतकऱ्यांची सरसकट पीक कर्जमाफी व्हावी, अशी मागणी करून शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे म्हणाल्या सरकारने सरसकट पीक कर्ज माफ करावे तसेच पीक कर्जातून ज्वारी पिकास वगळण्यात आले. केंद्र सरकारच्या धोरणानुसार ज्वारी हे पीक महत्त्वाचे असून ज्वारीलाही नुकसानग्रस्त पिकांच्या यादीत घ्यावे, अशी मागणी केली आहे.