Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नियमांचे पालन करणाऱ्या पतसंस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : बाळासाहेब पाटील

पतसंस्थांना आर्थिक शिस्त लागावी व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाकडून नियमांचे वेळोवेळी आदेश काढले जातात. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या सहकारी संस्थाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 17, 2022 | 06:26 PM
नियमांचे पालन करणाऱ्या पतसंस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : बाळासाहेब पाटील
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : पतसंस्थांना आर्थिक शिस्त लागावी व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाकडून नियमांचे वेळोवेळी आदेश काढले जातात. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या सहकारी संस्थाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा व सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थेचे फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकारी आणि नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व सेवक सहकारी पतसंस्थांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन सहकार व पणन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यशाळेस राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, आयुक्त व निबंधक सहकारी संस्थांचे अनिल कवडे, कोल्हापूर विभागाचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे तसेच बँकेचे संचालक उपस्थित होते.

बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्ह्यात सहकाराचे मोठे जाळे आहे. बँकांच्या ठेवीवर संरक्षण मिळते. तसेच पतसंस्थांच्या ठेवीवर संरक्षण कसे मिळावे यासाठी सहकार विभागाकडून अभ्यास करण्यात आला आहे. बँका ज्याप्रमाणे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. त्याप्रमाणे पतसंस्थांनी काळाप्रमाणे बदलले पाहिजे. संस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी आर्थिक शिस्तही पाळली पाहिजे.

ज्या उद्देशाने पतसंस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच उद्देशाने संस्था चालवावी. गेल्या दोन-अडीच वर्षात कोरोना संकटामुळे अनेक संस्थांना अडचणी आल्या. संस्थांना आर्थिक शिस्त लागावी व संस्था वृद्धिंगत व्हावी यासाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहे. सहकारी संस्थांनी दूरदृष्टी ठेवून लोकांच्या हितासाठी कामे करावे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The government stands firmly behind the credit unions that follow the rules says balasaheb patil in satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2022 | 06:26 PM

Topics:  

  • balasaheb patil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.