Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणारचे पाणथळ क्षेत्र पक्ष्यांसाठी नंदनवन! आशियाई पाणपक्षी गणनेत स्थानिक पक्ष्यांची मोठी नोंद

खाऱ्या पाण्याच्या जंगलासाठी ओळख असलेल्या लोणार सरोवरातील पाणथळ क्षेत्र पाणपक्ष्यांसाठी नंदनवन ठरत असल्याचे आशियाई पाणपक्षी गणनेतून स्पष्ट झाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 23, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

खाऱ्या पाण्याच्या जंगलासाठी जागतिक पातळीवर ओळख असलेल्या लोणार सरोवर परिसरातील पाणथळ क्षेत्र हे पाणपक्ष्यांसाठी नंदनवन ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. वेटलँड्स इंटरनॅशनल साउथ एशिया, मी लोणारकर टीम, निसर्ग मल्टिपर्पज फाउंडेशन (लोणार) आणि अकोला वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते रविवार (दि. १८) दरम्यान लोणार रामसर साइट तसेच अभयारण्य परिसरात आशियाई पाणपक्षी गणना (Asian Waterbird Census) राबविण्यात आली. या गणनेत मोठ्या प्रमाणात स्थलांतरित तसेच स्थानिक पाणपक्ष्यांची नोंद झाली आहे.

Davos Investment: एआय आणि शाश्वत उद्योगक्षेत्रात MMRDA ची भरारी; तब्बल २६ अब्ज डॉलर्सचे…

लोणार सरोवर, अभयारण्य परिसर, अंबर तलाव आणि काळा पाणी तलाव या ठिकाणी ही गणना करण्यात आली. या मोहिमेमुळे लोणार परिसरात येणाऱ्या पाणपक्ष्यांच्या नोंदी जागतिक नकाशावर पोहोचणार असून, या नोंदी ई-बर्ड इंटरनॅशनल अॅपवर अपलोड करण्यात आल्या आहेत. या गणनेचे आयोजन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम. एस. रेड्डी, अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी यशवंत नागुलवार तसेच आशियाई पाणपक्षी गणनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यंदाच्या गणनेत पाणकाराळा, नॉर्दन पिंटेल, शॉवलर, वारकरी, लॉंग बिल्ड पिपिट, स्पूनबिल, तसेच ओरिएंटल डार्टर हे पाणपक्षी मोठ्या संख्येने आढळून आले. विशेष म्हणजे मागील गणनेत केवळ १ ते २ संख्येत दिसणारा ओरिएंटल डार्टर यावर्षी लक्षणीय प्रमाणात आढळून आला. जलाशयाच्या परिसरात पाणपक्ष्यांच्या विविध प्रजातींमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. यामुळे लोणार पाणथळ क्षेत्र हे पक्ष्यांसाठी सुरक्षित आणि अनुकूल अधिवास असल्याचे सिद्ध होत आहे.

या गणनेदरम्यान यावर्षी काही विशेष पाणपक्ष्यांचीही नोंद झाली आहे. यामध्ये कॉमन स्नाईप, ब्राह्मणी बदक, गॉडविट, रिव्हर टर्न, कॉमन पोचार्ड या पक्ष्यांचा समावेश आहे. ही नोंद पक्षी अभ्यासक आणि निसर्गप्रेमींसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

या मोहिमेत महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे बुलढाणा जिल्हा समन्वयक व ‘मी लोणारकर’ टीमचे सचिन कापुरे, पक्षीमित्र विलास जाधव, संतोष जाधव, कमलेश आगरकर, विनय कुलकर्णी, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रामटेके, वनरक्षक सदाशिव वाघ तसेच वन्यजीव लोणार टीमने सक्रिय सहभाग घेतला. डॉ. राजू कसंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण गणना यशस्वीरीत्या पार पडली.

“मुंब्र्याला हिरवं करायचं आहे…”; AIMIM नगरसेविका Sahar Sheikh अडचणीत, पोलिसांनी बजावली नोटीस

आशियाई पाणपक्षी गणनेमुळे लोणारच्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले असून, पाणथळ क्षेत्रांच्या संवर्धनाची गरजही अधोरेखित झाली आहे. या उपक्रमामुळे लोणार सरोवर व परिसरातील पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असून, भविष्यात पाणपक्ष्यांच्या संरक्षणासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: The lonar wetland is a paradise for birds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 04:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.