फोटो सौजन्य- प्रतिनिधी
समीर पिंपळकर /दापोली: छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा म्हणून घोषित होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युनेस्कोचे तज्ज्ञ पथक सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी करणार आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गोवा किल्ला ते पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ला यासाठी निधीतून जेट्टी बांधण्यात येणार आहे. किल्ल्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने किल्ल्यावर घनकचरा व्यवस्थापन करणे, किल्ल्याच्या परिसरात गवत व मातीचा फरशीचा थर काढून टाकणे, किल्ल्याची दुरुस्ती करणे, तटबंदी भरणे, पदपथाची निर्मिती करणे तसेच इतर कामे हाती घेण्यात येणार आहेत. राज्यातील अकरा किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश होण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा समावेश असल्याने शिवप्रेमी मध्ये उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याचा यादीत समावेश होण्यासाठी शिवप्रेमींनी किल्ल्याच्या साफसफाईला सुरुवात केली आहे.
साफसफाई अभियान च्या पहिल्याच दिवशी शेकडो हाताने किल्ल्यावरील बुर्जावर वाढलेली झाडे झुडपे, गवत तसेच चोर दरवाजा मुख्य प्रवेशद्वार तोफखाना, विहीर तलाव या परिसरातील साफसफाई केली. मोठ्या प्रमाणात गवत वाढले असल्याने कटर मशीनच्या सहाय्याने साफसफाई करण्यात आली पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये किल्ला पूर्णपणे स्वच्छ केला जाणार आहे.रविवारी सर्वच शासकीय कर्मचारी साफसफाई अभियानात सहभागी होणार असल्याने उद्याच्या साफसफाई मोहिमेला अधिक गती प्राप्त होणार आहे.हर्णे सुवर्णदुर्ग किल्याची जागतिक वारसा यादीत नोंद होण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरणशेकड़ो हात साफसफाईसाठी सरसावले आहेत.हर्णे येथील जय भवानी प्रतिष्ठान, तालुक्यातील शिवप्रेमी व जय शिवराय प्रतिष्ठान दापोलीचे सदस्यांमार्फ़त सुवर्णदुर्ग किल्ल्याची साफसफाई केली जात आहे. साफसफाईच काम पुढे चार ते पाच दिवस चालण्याची शक्यता आहे.
2 ऑक्टोबर रोजी युनेस्कोची टीम पाहणीसाठी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर येणार
2 ऑक्टोबर रोजी युनेस्कोची टीम पाहणीसाठी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर येणार असून त्यामुळं प्रशासन तयारीला लागले आहे.युनेस्कोच्या मान्यतेनंतर सुवर्णदुर्ग किल्ला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर झळकणार आहे.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा म्हणून घोषित होण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत. युनेस्कोचे तज्ज्ञ पथक सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी करणार आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गोवा किल्ला ते पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ला यासाठी निधीतून जेट्टी बांधण्यात येणार आहे.
हर्णे येथे 16 व्या शतकात बांधलेले 4 किल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार याच ठिकाणी होते, पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बाजूलाच भुईकोट, कनकदुर्ग, फत्तेगड असे तीन किल्ले आहेत.सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा प्राप्त होणार असल्याने या किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार आहे. तसेच या ठिकाणी जागतिक पर्यटक येणार असल्याने सुवर्णदुर्ग किल्ल्याचे नाव जगाच्या नकाशावर सुवर्णाक्षरात कोरले जाणार आहे.यासाठी शेकड़ो हात साफसफाईसाठी सरसावले असून शनिवारपासून या कामाला सुरुवात झाली आहे.
साफसफाईच हे काम पुढे चार ते पाच दिवस चालण्याची शक्यता
हर्णे येथील जय भवानी प्रतिष्ठान, तालुक्यातील शिवप्रेमी व जय शिवराय प्रतिष्ठान दापोलीचे सदस्यांमार्फ़त सुवर्णदुर्ग किल्ल्याची साफसफाई केली जात आहे. साफसफाईच हे काम पुढे चार ते पाच दिवस चालण्याची शक्यता असून अखेरपर्यंत काम करण्याची इच्छा सफाई सदस्यानी बोलून दाखवली आहे.दि. २ ऑक्टोबर रोजी युनेस्कोची टीम पाहणीसाठी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर येणार असून त्यामुळं प्रशासन तयारीला लागले आहे. युनेस्कोच्या मान्यतेनंतर सुवर्णदुर्ग किल्ला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर झळकणार आहे.
आज सुरु झालेल्या साफसफाई कार्यात अरुण पाटिल, दीपक खेडेकर, भूषण वेलदुरकर, सुनील आंबुर्ले, सुधीर राणे, पुरातत्व विभागाचे बजरंग येलीकर यांचेसह हर्णे येथील जय भवानी प्रतिष्ठान, तालुक्यातील शिवप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ व जय शिवराय प्रतिष्ठान दापोलीचे सदस्य उपस्थित होते.