
Kolhapur Mayoral Election: कोल्हापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. अनेकांनी या पदावर आपला हक्क सांगितला असून त्यामुळे महापौर पदाच्या उमेदवाराची निवड आणि इच्छुकांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान भाजप नेत्यांवर आले आहे. यामध्ये विशेषता: सोशल मीडियावर उमेदवार समर्थकांनी आपला हक्क साकारण्यासाठी पोस्ट व्हायरल करण्याचा सपाटा चालविला आहे. यामुळे नेत्यांमध्ये एक गोंधळ उभा राहिला असून एकाच वेळी अनेक जण महापौर पदासाठी स्वतःचे नाव घेत आहेत. (Kolhapur Municipal Election 2026)
निवडणुकीच्या वेळी नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त होती, त्यानंतर नेत्यांना या इच्छुकांना थांबवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. निष्ठावंत कार्यकर्त्यांत नाराजी पसरली होती. काही कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य करण्याचे आश्वासन दिले गेले होते . परंतु कांहीं ना आश्वासन दिल्यानंतर ते पाळले जाईल का? याबाबत शंका निर्माण झाली होती. अशांनी बंडखोरी करून मैदानात लढत दिली.
बदलापूरच्या घटनेवरुन काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी दिला गंभीर इशारा
अशा परिस्थितीत कोल्हापूरच्या महापौर पदावर कोणाला संधी मिळेल आणि नाराज इच्छुकांना काय शब्द दिले जातील ? हे सर्वच अनिश्चित आहे. यामुळे स्थानिक भाजप नेत्यांनी आपल्या पक्षाचे हित पाहून सर्व इच्छुकांचे नाराजी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी प्रत्येक इच्छुकांची स्थिती समजून घेतले जात असून काही गोष्टी पुढे ठरविण्याचा मानस केला आहे.
दरम्यान , सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या इच्छुकांच्या पोस्ट आणि फोटोसह ते आपला हक्क मागताना दिसत आहेत. यामुळे भाजपा नेत्यांच्या निर्णय प्रक्रियेत अडचणी वाढल्या असून इच्छुकांची नाराजी आणखी वाढू नये म्हणून नेत्यांना कडवा निर्णय घ्यावे लागेल असे चित्र दिसत आहे. कोल्हापूरच्या महापूर पदावर इच्छुकांची संख्या अधिक असली तरी व्यक्तीगत संवादाच्या माध्यमातून त्यांची नाराजी दूर करण्याचा मार्ग नेत्यांना शोधावा लागेल. पक्षाच्या धोरणानुसार निर्णय घेतल्यासच यावरील गोंधळावर मात केली जाऊ शकते. सर्वांच्या अपेक्षा नुसार महापौर पदावर अंतिम निर्णय होईल आणि तो सर्वांना स्वीकारण्यासारखा ठरेल अशी आशा भाजपा नेत्यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra Municipal Election 2026)
Census 2027: जनगणना २०२७: पहिल्या टप्प्याची घोषणा; १ एप्रिलपासून मोहिमेला सुरुवात
महापौर पदासाठी इच्छुकांमुळे पक्षांतर्गत राजकारण तापले असून वरिष्ठ पातळीवरून हालचालींना वेग आला आहे. नाराज इच्छुकांची समजूत काढण्यासाठी बंद दाराआड बैठका, फोना फोनी आणि मध्यस्थी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. काही इच्छुकांना स्थायी समिती , सभागृह नेतेपदाचे आश्वासन देण्यावर चर्चा होत आहे. मात्र दिलेला शब्द प्रत्यक्षात पाळले जातील का ? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये साशंकता आहे. अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत सोशल मीडियावरील दावे प्रति दावे सुरू ठेवणार असल्याचे चित्र सध्यातरी इच्छुक समर्थक करीत आहेत.