अंबरनाथ तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा जाहीर
दर्शन सोनवणे, अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा जाहीर करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्देशांचे अनुपालन करण्यासाठी शासनाला पुन्हा अधिसूचना काढावी लागली. त्यानुसार राज्य शासनाने १३ जून रोजी अधिसूचना काढून आरक्षण सोडत सभा पुन्हा घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १५ जुलै पर्यंत २०२५ ते २०३० या कालावधीसाठी पुन्हा आरक्षण सोडत सभा आयोजित करण्याचे निर्देश होते. शासनाच्या आदेशानुसार मंगळवारी महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात फेर आरक्षण सोडत सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींची पुन्हा आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये २ अनुसूचित जाती, ३ अनुसूचित जमाती तर ८ ग्रामपंचायत मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव अशी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली, अशी माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली.
महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित आरक्षण सोडत सभेत विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ट्या काढून तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. ही सोडत सभा उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार अमित पुरी यांच्या उपस्थितीत शांततामय वातावरणात पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. मात्र या पुन्हा घेतलेल्या आरक्षण सोडतीनंतर कही खुशी, कही गम अशी परिस्थिती तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये पहायला मिळाली.
अनुसूचित जाती :
१) बुर्दुल – स्त्री (अ. जा)
२) साई – (अ. जा )
अनुसूचित जमाती :
१)डोणे – स्त्री (अ. ज)
२) मांगरूळ (अ. ज)
३) सागाव (अ. ज)
नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग : स्त्री
१) खरड ( स्त्री )
२) काकोळे ( स्त्री )
३) गोरेगाव ( स्त्री )
४) ढवळे- कुडसावरे ( स्त्री )
नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग:
१) मुळगाव
२) सावरे
३) मलंग वाडी
४) चामटोली
सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री :
१) ढोके – दापीवली
२) उसाटणे
३) राहटोळी
४) काराव
५) नाऱ्हेन
६) अस्नोली
७) आंबेशीव बु.
८) चरगाव
सर्वसाधारण प्रवर्ग :
१) नेवाळी
२) पोसरी
३) कान्होर
४) कासगाव
५) वांगणी
६) चोण
७) दहीवली