Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
Navabharat Influencer Summit 2025: जर तुम्ही सुद्धा इन्फ्लुएंसर असाल आणि तुमच्या कृतीतून सकारात्मक बदल घडले असेल तर मग नक्कीच तुम्ही नवभारत इन्फ्लुएंसर समिट 2025 मध्ये सहभागी व्हायला पाहिजे. नवभारत मीडिया समूह तर्फे 11 October 2025 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या “Navbharat Influencer Summit 2025” साठी नामांकन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. येथे 5 ऑक्टोबर 2025 ही नामांकन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.
या विशेष कार्यक्रमाला देशभरातून Influencers चा मोठा प्रतिसाद मिळाला आहे, जे आपल्या-आपल्या क्षेत्रात बदल घडवत आहेत आणि लाखो लोकांना प्रेरित करत आहेत. जर तुम्हालाही तुमची कहाणी आणि प्रभाव या मंचावर मांडायचा असेल, तर लगेच Nomination Form भरा. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर आमची टीम पुढील प्रक्रियेसाठी तुमच्याशी संपर्क साधेल.
नवभारत इन्फ्लुएंसर समिट 2025 मध्ये स्वत:ला नॉमीनेट करण्यासाठी येथे क्लिक करा
यंदाच्या Summit ची थीम “Real Influence, Real Impact” अशी असून, 25 कॅटेगरीमध्ये अशा Influencers ना सन्मानित करण्यात येईल ज्यांनी क्रिएटिव्हिटी, सोशल सर्व्हिस, एज्युकेशन, हेल्थ, आर्ट, टेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. जर तुम्हाला Nomination Process कशी असते हे जाणून घ्यायचे असेल, तर खाली दिलेला Video नक्की पाहा.
येत्या 11 ऑक्टोबर रोजी मुंबईत नवभारत मीडिया ग्रुप ‘नवभारत इन्फ्लुएंसर समिट २०२५’ आयोजित करणार आहे. ताज द ट्रीज येथे सायंकाळी 6 वाजल्यापासून होणाऱ्या या समिटची थीम ‘रिअल इन्फ्लुएंसर, रिअल इम्पॅक्ट’ आहे आणि समाजावर सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या प्रभावकांना सन्मानित करणे हे या समिटचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे म्हणजे २५ कॅटेगरीत दिले जाणारे पुरस्कार. नवभारत मीडिया ग्रुपने यासाठी इन्फ्लुएंसरकडून नामांकने मागवली आहेत. या कॅटेगरीत लेखक, ऑटोमोटिव्ह आणि विमान वाहतूक, क्रीडा, विनोद, कवी, कथाकार, चित्रपट समीक्षक, शिक्षण, मनोरंजन आणि नवभारत संपादकांची निवड यासह विविध क्षेत्रांचा समावेश आहे.
याशिवाय वित्त, फॅशन, आतिथ्य, तंत्रज्ञान, संगीत, आरोग्य, रिअल इस्टेट, पेरेंटिंग, पॉडकास्ट, कला, गेमिंग आणि पाळीव प्राणी या क्षेत्रांशी संबंधित Influencers ना त्यांच्या कामासाठी गौरविण्यात येईल. यामध्ये ‘उभरते Influencer’ ही एक विशेष कॅटेगरी ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे नव्या चेहऱ्यांना ओळख मिळेल.
ही समिट Influencers ना एकत्र आणून त्यांचे विचार आणि अनुभव शेअर करण्याची संधी देईल, ज्यामुळे त्यांचा प्रभाव अधिकाधिक परिणामकारक होऊ शकेल. या खास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नवभारत ग्रुप सर्वांना आमंत्रित करत आहे.