मुंबई : सोमवारी संध्याकाळापासून मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rains in Mumbai) पडत आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकणसह मुंबईला ऑरेज अलर्ट (Orange Alert) हवामान खात्याने (weather department) दिली आहे. दरम्यान, मुंबईत मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणी पाणी साचत असून, दुर्घटना सुद्धा घडत आहेत. दरम्यान, आता विक्रोळीतील पंचशील नगर (Vikroli panchsir nagar) येथे घरांवर झाडे उन्मळून दरड कोसळली आहे. यामध्ये घरांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी घाटकोपर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी (police and firefighters) धाव घेत परिवाराला बाहेर काढून अडकलेले सर्व सामान बाहेर काढण्याची मदत सुरु. (landslide in houses in Panchsheel Nagar, Vikhroli) पावसामुळं या घरातील मोठं नुकसान झालं आहे.
[read_also content=”मुंबईकरांसाठी नवीन 47 एसी लोकल लवकरच, आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविण्यात येणार https://www.navarashtra.com/maharashtra/the-new-47-ac-local-for-mumbaikars-will-soon-300759.html”]
दरम्यान, मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळं दादर, सायन, हिंदमात, वरळी, बीडीडी. अंधेरी आदी भागात पाणी तुंबले आहे. मुंबई सह उपनगरात एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढला तर त्याचा परिणाम मध्य व पश्चिम रेल्वेवर सुद्धा होईल असं बोललं जात आहे.