वर्धा- वर्ध्यात आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) सुरुवात झाली आहे. वर्ध्यात (Wardha) आजपासून सारस्वतांचा मेळा, अर्थात माय मराठीचा जागर होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonkar) आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगणात साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळं आजपासून सारस्वतांचा मेळावा भरला आहे. दरम्यान, संमेलानाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ उडाल्याचे चित्र आहे.
काय म्हणाले नरेंद्र चपळगावकर?
दरम्यान, मागील महिन्यात मुंबईत राज्य सरकारने विश्व साहित्य संमेलन भरविले होत. याला विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच मराठी भाषा मंत्री दिपक केसरकरांनी यावेळी मोठी घोषणा केली होती. साहित्य संमेलनाला ५० लाखाच्या निधीत वाढ केली जाईल, व हा निधी २ कोटी दिला जाईल, असं केसरकरांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्य अध्यक्षीय भाषणात व्यासपीठावरुनच मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. विश्वस साहित्य संमेलन घेणे हे काही सरकारचे काम नाहीय. संमेलन भरवणे शिंदे सरकारचं काम नव्हे, असे मुख्यमंत्र्यांचे कान टोचले.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी…
दरम्यान, आज पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी प्रेक्षकांमधून गोंधळ घालण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी करण्यात आली. ह्या घोषणा तीन विदर्भावाद्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, सामान्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ. पण हे साहित्याचं व्यासपीठं आहे. येथे गोंधळ नको असं मुख्यमंत्री म्हणाले.