Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसबा पोटनिवडणुकीत खासदार गिरीश बापट ऑक्सिजन सिलिंडरसह प्रचारसभेत, रासनेंसाठी मोठी फिल्डिंग, बापट म्हणाले..

अखेर भाजपने आजारी खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांना कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth Bypoll) रिंगणात उतरविले आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला व्हिलचेअरवरून बापट यांना आणले गेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 17, 2023 | 06:22 AM
कसबा पोटनिवडणुकीत खासदार गिरीश बापट ऑक्सिजन सिलिंडरसह प्रचारसभेत, रासनेंसाठी मोठी फिल्डिंग, बापट म्हणाले..
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : अखेर भाजपने आजारी खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांना कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth Bypoll) रिंगणात उतरविले आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ऑक्सिजन सिलिंडरसह व्हिलचेअरवरून बापट यांना आणले गेले. यावर विरोधकांकडून टीका केली गेली. सोशल मीडियावरही भाजपच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले बापट हे प्रकृती ठीक नसल्याने या पोटनिवडणुकीच्या प्रचारापासून दूर राहिले होते. त्याचवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने भाजपकडून ही जागा कायम राखण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करण्यावर भर दिला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीची धुरा स्वत:कडेच घेतल्याचे दिसत आहे. पुण्याच्या राजकारणात तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रवेश झाल्यानंतर बापट यांचे पक्षांतर्गत राजकारणातील महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला गेला होता.

‘कसब्याची ताकद; गिरीश बापट’

‘कसब्याची ताकद; गिरीश बापट’ ही घोषणा भाजपमधील बापट समर्थकांकडून काही पक्षातंर्गत कार्यक्रम, विविध आंदोलनातून ऐकायला मिळत होती. सध्या सुरु असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात बापट हे प्रकृती ठीक नसल्याने लांब होते. त्याचा फटका हा महायुतीचे उमेदवार रासने यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. हा धोका टाळण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी आजारी असणारे खासदार बापट यांना व्हिल चेअरवरून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आणले.

ही निवडणूक चुरशीची नाही , विजय आपलाच

या मेळाव्यात बापट यांनी दोन मिनिटांचे मनोगत मांडले. तत्पूर्वी त्यांचे एक पत्र वाचून दाखविण्यात आले होते. बापट म्हणाले, ‘आपला पक्ष हा अनेक निवडणुका लढला, हरला पण पक्ष संघटन हे मजबूत राहिले आहे. ही पोटनिवडणूक चुरशीची नाही, विजय आपलाच होणार आहे. हेमंत हा चांगला उमेदवार आहे. कार्यकर्त्यांनी अधिक वेळ देऊन प्रचार करावा. कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा आहे. त्यांच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: This election is not tight victory is ours says bjp mp girish bapat in pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2023 | 08:38 PM

Topics:  

  • Girish bapat
  • Hemant Rasane
  • Mukta Tilak

संबंधित बातम्या

विसर्जन मिरवणुकीच्या वादावर संयुक्त बैठक कधी? गणेश मंडळांचे पदाधिकारी म्हणतात…
1

विसर्जन मिरवणुकीच्या वादावर संयुक्त बैठक कधी? गणेश मंडळांचे पदाधिकारी म्हणतात…

एकत्र वाटत असलेल्या महायुतीतच वादाची ठिणगी? शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये ‘या’ कारणामुळे पेटले युद्ध
2

एकत्र वाटत असलेल्या महायुतीतच वादाची ठिणगी? शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये ‘या’ कारणामुळे पेटले युद्ध

Pune Accident: दारू पिऊन १२ जणांना उडवले; पुण्यातील घटनेबाबत CM फडणवीसांचे ‘हे’ महत्वाचे निर्देश
3

Pune Accident: दारू पिऊन १२ जणांना उडवले; पुण्यातील घटनेबाबत CM फडणवीसांचे ‘हे’ महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.