Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीन मित्रांची यारी! एकत्र अभ्यास, एकत्र वकिली आणि आता झाले न्यायाधीश; शिरूरच्या युवकांचे MPSC मध्ये घवघवीत यश

न्यायाधीश होण्याचे एकत्रितपने स्वप्न पाहिलेल्या या तिन्ही मित्रांना एकाचवेळी मिळालेल्या यशाने या मैत्रीची चर्चा रंगली आहे. भविष्यात हे तिघे मित्र राज्यातील विविध न्यायालयांमध्ये न्यायदानाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 03, 2025 | 04:23 PM
तीन मित्रांची यारी! एकत्र अभ्यास, एकत्र वकिली आणि आता झाले न्यायाधीश; शिरूरच्या युवकांचे MPSC मध्ये घवघवीत यश

तीन मित्रांची यारी! एकत्र अभ्यास, एकत्र वकिली आणि आता झाले न्यायाधीश; शिरूरच्या युवकांचे MPSC मध्ये घवघवीत यश

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत तीन मित्रांच्या मैत्रीची अनोखी यशोगाथा समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील ॲड. शुभम कराळे, ॲड. सागर नळकांडे, आणि ॲड. अक्षय ताठे या तीन मित्रांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळवले असून, तिघांचीही न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. न्यायाधीश होण्याचे एकत्रितपने स्वप्न पाहिलेल्या या तिन्ही मित्रांना एकाचवेळी मिळालेल्या यशाने या मैत्रीची चर्चा रंगली आहे.

हे तिन्ही तरुण कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले. ॲड. शुभम कराळे शिक्रापूरचा, ॲड. सागर नळकांडे बुरुंजवाडी गावचा, तर ॲड. अक्षय ताठे कारेगावचा रहिवासी आहे. तिघांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांतून एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवी (एल.एल.एम.) मिळवली.

त्यावेळी एकाच तालुक्यातील या मित्रांची भेट पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी वकिली करताना अनेक गाजलेल्या प्रकरणांमध्ये फिर्यादी व पीडितांना न्याय मिळवून देता आला, ही बाब माझ्यासाठी समाधानाची आहे, असे ॲड. शुभम कराळे यांनी सांगितले. दरम्यान, ॲड. सागर नळकांडे आणि ॲड. अक्षय ताठे हे दिवाणी न्यायालयात वकिली करत होते. तिघेही एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करीत न्यायालयात कार्यरत होते.

एकत्र अभ्यास, एकत्र यश…

न्यायाधीश होण्याचे स्वप्न उराशी बाळगून या तिघांची मैत्री अधिक दृढ झाली. वकिली व्यवसाय सांभाळत त्यांनी चार वर्षे नियमित अभ्यास केला. परीक्षा जवळ आल्यावर मोबाईलचा कमीत कमी वापर करून, तसेच आशिलांशी मोजकाच संपर्क ठेवत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

२०२३ साली एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेसाठी तिघांनी मिळून तयारी केली. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांनी या परीक्षेसाठीचा अभ्यास केला आणि पूर्व आणि मुख्य परीक्षेत यश मिळवले. नुकत्याच झालेल्या मुलाखतीनंतर जाहीर झालेल्या निकालात ११४ विद्यार्थ्यांची न्यायाधीशपदासाठी निवड झाली असून, त्यामध्ये या तिघांचाही समावेश आहे.

एका तालुक्यातून शिक्षणासाठी एकत्र निघालेला हा प्रवास आता लोकसेवेपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात हे तिघे मित्र राज्यातील विविध न्यायालयांमध्ये न्यायदानाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

Web Title: Three friends from shirur selected as judges through the examination conducted through mpsc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • Court
  • mpsc jobs
  • Shirur News

संबंधित बातम्या

पुराने सोडले MPSC वर पाणी! राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलली, या तारखेला होणार परीक्षा
1

पुराने सोडले MPSC वर पाणी! राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलली, या तारखेला होणार परीक्षा

Mumbai Court : “उज्ज्वल निकम यांना माझ्या खटल्यातून काढून टाका…,” कसाबला फाशी देणाऱ्या सरकारी वकिलाची गुंडाला धास्ती
2

Mumbai Court : “उज्ज्वल निकम यांना माझ्या खटल्यातून काढून टाका…,” कसाबला फाशी देणाऱ्या सरकारी वकिलाची गुंडाला धास्ती

मुलगी झाली म्हणून पत्नीचा गळा दाबून खून; न्यायालयाने पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

मुलगी झाली म्हणून पत्नीचा गळा दाबून खून; न्यायालयाने पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार; न्यायालयाने आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार; न्यायालयाने आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.